बऱ्याच महिला आणि मुलींमध्ये एक समस्या नेहमी जाणवते ती म्हणजे मासिक पा-ळी वेळेवर न येणे किंवा मासिक पा-ळी मध्ये वेगवेगळ्या समस्या जाणवणे. त्याचबरोबर वजन कमी असणे, रक्ताची कमी असणे, रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, हाडे मजबूत नसणे, खाल्लेले व्यवस्थित पचन न होणे यापैकी तुम्ही कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय केल्यास तुमच्या समस्या कायमच्या दूर होतील.

हा उपाय खूपच साधा आणि सरळ आणि घरच्या घरी बनवता येण्यासारखा आहे. विशेष म्हणजे हा उपाय केल्यास रक्त कमी असण्याची समस्या देखील नाहीशी होते. मासिक पा-ळी वेळेवर येत नसेल, खूप दिवस येत नसेल किंवा मासिक पा-ळीमध्ये विविध समस्या जाणवत असतील तर त्यामध्ये देखील आराम मिळतो.

हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागतात जे घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. एक चमचा बडीशेप घेऊन ती एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवावी. बडीशेप हि विटामिन सी युक्त असते. बडीशेप विविध प्रकारचे पचनाचे आजार घालवण्यासाठी उपयुक्त ठरते. आम्लपित्त, पोटफुगी, उचकी, जुलाब, अपचन आणि गॅस होत असेल तर यामध्ये प्रभावी ठरते.

बडीशेप भिजत ठेवलेल्या पाण्यामध्येच दोन वेलदोडे टाकावे. वेलदोडे हे पाचक असतात आणि पोषण तत्व शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी वेलदोडे अत्यंत महत्वाची कामगिरी बजावतात. आपण जे खातो ते शरीरामध्ये व्यवस्थितरित्या शोषण होते त्यामुळे आपली प्रकृती ठीक होते, रक्त वाढते आणि मासिक पा-ळी मधील जे त्रास आणि समस्या त्या दूर होतात. शिवाय वेलदोडे हे किडनीचे कार्य सुधारण्यास देखील मदत करतात.

तिसरा जो घटक यामध्ये वापरायचा आहे तो म्हणजे खारीक. दोन खारीक घेऊन त्यामधील बी काडून टाकावे आणि थोडे ठेचून घ्यावे आणि त्या पाण्यामध्ये भिजत ठेवावे. या तिन्ही घटकांचे मिश्रण एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावे.

खारीकमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शिअम, कॉपर, मॅगनीज खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते आणि हाडांचे आरोग्य सुधारते. हाडांच्या आतमध्ये जो मगज असतो त्यामध्येच आपले रक्त तयार होत असते, हि क्रिया वाढण्यास मदत मिळते. खारीक मध्ये तेविस प्रकारचे अमिनो अॅ-सिड असतात जे यौ-न स्वस्थ संबंधी आजारामध्ये प्रभावी ठरतात.

हे तिन्ही घटक रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे यामध्ये चांगले आयुर्वेदिक गुणधर्म तयार होण्यास मदत मिळते. रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर सकाळी मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यावे. मिक्सरमधून काढल्यानंतर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी प्यावे. त्यानंतर अर्ध्या एक तासानंतर तुम्ही चहा घेऊ शकता.

हे मिश्रण घेतल्यानंतर मासिक पा-ळी व्यवस्थित येण्यास, शरीरामध्ये रक्त वाढण्यास सुरुवात होईल आणि यामुळे वजन देखील चांगले होईल. रोगप्रतिकार शक्ती वाढेल. लहान मुलांना देखील हे मिश्रण अवश्य देऊ शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने