जरा या फोटोला व्यवस्थित पहा, तुम्हाला यामध्ये एखादा खतरनाक जीव दिसतो का? कदाचित तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर यामध्ये कोणताही जीव दिसून येणार नाही, पण लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला तो जीव पाहायला मिळेल. वास्तविक या झाडावर एक विषारी साप लपला आहे, जो हुबेहूब झाडाच्या रंगासारखाच आहे. एक साधारण चूक देखील कोणाचाही जीव घेऊ शकते.

हा फोटो ऑस्ट्रेलियाच्या उत्तर सिडनीच्या मैटलँड येथे घेण्यात आला होता. जो लिएन कूक नावाच्या एका फेसबुक युजरने पोस्ट केला होता. इंटरनेटवर सध्या हा फोटो लाखोवेळा शेयर करणात आला आहे. त्या व्यक्तीने लिहिले आहे कि या झाडाच्या जवळून अनेक लोक गेले पण त्यांना कोणालाही या झाडावर असलेला हा साप दिसला नाही. या सापाच्या प्रजातीला स्टीफन ब्रॅन्डेड नावाने ओळखले जाते, खूपच विषारी सापांपैकी हा एक साप आहे.

झाडांवर राहते या सापांची प्रजाती

स्टीफन ब्रॅन्डेड प्रजातीचे साप जास्तकरून ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतात आणि यांचे राहण्याचे मुख्य स्थान झाड असते. सर्वात मोठी बाब हि आहे कि या सापाचा रंग ग्रे आणि क्रीम कलर शिवाय पांढरा आणि काळा देखील असतो. अशामध्ये हे साप हुबेहूब झाडासारखेच दिसतात, जे अनेकवेळा उघड्या डोळ्यांनी दिसत सुद्धा नाहीत. त्याची लांबी १.२ मीटर पर्यंत असते आणि अनेक वेळा हे ९ पिल्लांना जन्म देऊ शकतात.

चावल्यामुळे होऊ शकतो मृत्यू

हा साप इतका खतरनाक आहे कि जर एखाद्याला हा साप चावला तर त्याचा काही तासामध्येच मृत्यू होऊ शकतो. अशामध्ये त्वरित उपचार केल्याने त्या व्यक्तीला वाचवले जाऊ शकते. हा साप चावल्याने उच्च प्रोथ्रोम्बिनस एन्जाइम उत्पन्न होतात जे रक्तामध्ये थ्रॉम्बिन वाढवतात. ज्यामुळे रक्तामध्ये गाठी होऊ लागतात आणि व्यक्तीचा मृत्यू होतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने