असे म्हंटले जाते कि जेव्हा मुल जन्माला येते तेव्हापासूनच त्याची शिकण्याची प्रक्रिया सुरु होते आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट हि आहे कि कुटुंबच मुलाची पहिली शाळा आहे. जिथून ते चांगले संस्कार शिकतात आणि आई त्याची पहिली गुरु असते.

हेच कारण आहे कि आज देखील आपल्या देशामध्ये जेव्हा कोणी चूक करते किंवा काही चांगले करत तेव्हा निश्चित रूपाने त्याचे श्रेय त्याच्या आईवडिलांना दिले जाते आणि असे म्हंटले जाते कि तुझ्या आईवडिलांनी तुला हे संस्कार दिले आहेत. हे दोन्हीही प्रकरणांमध्ये म्हंटले जाते.

जीवन जगण्यासाठी संस्कार खूपच महत्वाचे आहेत आणि प्रत्येक व्यक्ती काळानुसार नवीन नवीन संस्कार आणि सवयी शिकत राहतो. पण काही गोष्टी किंवा संस्कार मुलांना लहानपणापासूनच शिकवले जातात जे संपूर्ण आयुष्यभर त्याला उपयोगी पडतात.

जेणेकरून भविष्यामध्ये तो एक चांगला नागरिक आणि एक चांगला व्यक्ती बनेल किंवा तो चुकीच्या मार्गाने जातो. चला तर आज आपण जाणून घेऊया कि अशाच काही गोष्टी ज्या प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना शिकवले पाहिजेत.

बचत करायला शिकवावे

तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल कि मुले कोणत्याना कोणत्या गोष्टीवरून जिद्द करतात आणि जर आपण त्यांची जिद्द पूर्ण केली नाही तर ते अनेक दिवस रुसून बसतात. कधी कधी तर ते जेवण करायचे देखील बंद करतात. अशामध्ये हे खूपच आवश्यक आहे कि मुलांना काही वेगळ्या प्रकारे बचत आणि खर्चाबद्दल सांगितले पाहिजे.

त्यांना हे समजावले पाहिजे कि कुठे आणि किती बचत केली पाहिजे. बचन करण्याचे किती फायदे आहेत. यामुळे त्यांना देखील पैशांचे मोल समजेल आणि फालतू जिद्द करण्यापेक्षा ते स्वतः बचत करण्यात तुमची साथ देखील आणि पैशांचा विषय देखील काढणार नाहीत.

घरचे काम शिकवा

असे जरुरी नाही कि मुले लहान आहेत आणि ते कोणतेही काम करत नाहीत. हे जरुरीचे असते कि मोठ्यांप्रमाणे किंवा मोठ्यांचे काम करू शकत नाहीत. पण हे खूपच आवश्यक आहे कि मुलांना सुरुवातीपासूनच घरचे छोटे मोठे काम केले पाहिजे.

आईवडिलांनी देखील मुलांना काम करण्यास शिकवले पाहिजे. विशेष म्हणजे स्वयंपाकघरात काम करण्याचे शिक्षण जरूर दिले पाहिजे. हि गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कि फक्त मुलींनाच नाही तर मुलांना देखील काम करायला शिकवले पाहिजे.

से*क्स एजुकेशन

पाहायला गेले तर आजच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. हे बदल खूपच वेगाने होत आहेत. अशामध्ये से*क्स आणि यासंबंधी इतर अनेक गोष्टींबद्दल बोलण्यास लोक आज देखील संकोच करतात. हेच कारण आहे कि काही असामाजिक लोक अश्याप्रकारच्या माहितीचा अभाव असल्यामुळे गैरकृत्य करतात.

कधी कधी या गोष्टीची माहित नसल्यामुळे काही निरागस चुकीच्या तावडीत सापडतात. अशामध्ये हे खूप लक्षात घेण्यासारखे आहे कि जसे जसे मुलांचे वय वाढत जाईल तस तसे त्यांच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत राहतात. अनेक वेळा तर स्वतःमध्ये होत असलेल्या बदलांबद्दल त्यांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.

अशामध्ये फक्त शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणीच नाही तर घरामध्ये, कुटुंबामध्ये देखील मुलांना से*क्स आणि यासंबंधी गोष्टींबद्दल माहिती देणे खूपच आवश्यक आहे. सर्वात महत्वपूर्ण बाब हि आहे कि या विषयासंबंधीची माहिती खूपच शांत आणि संयमाने दिली पाहिजे. जेणेकरून समजणारे आणि समजावणारे या दोघांसाठी ते सहज राहील.

देशभक्ती जागृत करावी

प्रत्येक मुलामध्ये देशभक्तीची भावना असायला हवी, लहानपणापासूनच मुलांना हे संस्कार शिकवावेत. आपले प्रथम कर्तव्य हे आपल्या देशाप्रती आहे आणि आपल्या देशाच्या प्रती समर्पणाची भावना प्रत्येक मुलामध्ये असायला हवी. त्याला प्रत्येक क्षणी आपल्या देशाप्रती सेवा करण्यासाठी तत्पर राहायला हवे. शक्य असल्यास त्याला सैन्य शिक्षणासाठी प्रेरित करावे. देशभक्तीच्या कविता, कथा सांगाव्यात. आदर्श व्यक्तीचे जीवन चरित्र जाणून घेण्यासाठी जागरूक करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने