किन्नर समाज एक असा समाज आहे यांचे आशीर्वाद आणि श्राप खूप लागतात. यांनी जर खुश होऊन एखाद्याला आशीर्वाद दिला त्या व्यक्तीचे नशीब उजळण्यास वेळ लागत नाही. पण जर हे क्रोधीत झाले तर त्याचे अनेक परिणाम भोगावे लागतात. यांच्या जीवनाचा फक्त एकच आधार असतो आणि तो म्हणजे समारंभामध्ये जाने आणि नाचणे. किन्नर एक असा समाज आहे जो दुसऱ्यांसाठी नेहमी कुतूहलाचा विषय बनून राहला आहे.

बुध ग्रहाला शांत करतात किन्नर: हिंदू पुराणानुसार किन्नर बुध ग्रहाचे प्रतिक असतात आणि असे मानले जाते कि किन्नर बुध ग्रहाला शांत करतात. यामुळे जर एख्याद्या व्यक्तीला बुधवारच्या दिवशी जर यांनी आशीर्वाद दिला तर त्या व्यक्तीचे नशीब उजळते. जर तुम्हाला धन संपत्तीची कमी असेल तर एखाद्या किन्नरकडून एक रुपया घेऊन आपल्या पर्समध्ये अवश्य ठेवा किंवा त्या नाण्याला एखाद्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. तुम्हाला कधीच धन संपत्तीची कमी भासणार नाही.

किन्नरांना दान करण्याची प्रथा खूपच जुन्या काळापासून आहे. जेव्हा कधी आपल्या घरामध्ये शुभ काम असते तेव्हा किन्नरांचे येणे आणि आशीर्वाद देणे खूपच शुभ मानले जाते. त्यांचा प्रत्येक आशीर्वाद आपल्या जीवनामधील प्रत्येक कष्ट आणि समस्या नष्ट करतो. यामुळे कधीहि किन्नरला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये.

कधीच करू नये किन्नरांचा अपमान: असे म्हंटले जाते कि किन्नरांचा आशीर्वाद खूपच शक्तिशाली असतो. यामुळे त्यांचा कधीच अपमान करू नये. किन्नरांना दान करणे खूपच शुभ मानले जाते. पण हे लक्षात घेण्यासारखे आहे कि किन्नरांना काय दान करावे आणि काय नाही? दान करण्याची योग्य पद्धत माहित नसल्यामुळे त्याचे उचित फळ देखील मिळत नाही. जर तुम्ही एखाद्या किन्नरला दान देत असाल तर या पद्धतीचा जरूर अवलंब कराव. यामुळे दान करण्याचे महत्व अधिक वाढते.

सुपारी आणि नाणे: जर तुमचा वाईट काळ सुरु असेल तर किन्नरांना पुजेमधील सुपारी नाण्यावर ठेऊन दान करावी. असे केल्याने किन्नरांच्या आशीर्वादाचा प्रभाव आणखीन वाढतो. त्याचबरोबर तुमचा सुरु असलेला वाईट काळ देखील लवकर समाप्त होतो.

शृंगाराच्या वस्तू दान कराव्यात: जर तुमच्या विवाहित आयुष्यामध्ये अनेक समस्या सुरु असतील तर किन्नरांना शृंगाराच्या वस्तू दान कराव्यात. जसे हिरव्या बांगड्या, लाल साडी, कुंकू, लिपस्टिक इत्यादी दान करावे.

तांदूळ दान करावे: जर तुमची खूप इच्छा असेल कि आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमी पडू नये तर किन्नरांना तांदूळ दान करावे आणि दान केलेल्या तांदळामधून थोडे तांदूळ आपल्या घरामधील तांदळामध्ये टाकावे. कधीच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी भासणार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने