भारतीय संस्कृतीमध्ये कान टोचण्याची एक महत्वपूर्ण परंपरा आहे. हि परंपरा जुन्या काळापासून चालत आली आहे. तथापि जिथे पहिला फक्त महिलाच कान टोचून घेत असत पण आता पुरुष देखील कान टोचून घेऊ लागले आहेत.

आजकाल पुरुषांमध्ये देखील कान टोचून घेण्याचा ट्रेंड खूप प्रचलित झाला आहे. तसे तर फक्त फॅशनसाठी कान टोचून घेतले जातात, पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आयुर्वेदानुसार कान टोचल्याने रि-प्रो-ड-क्टि-व ऑर्गन हेल्दी राहतात. त्याचबरोबर इम्यून सिस्टम देखील मजबूत बनते.

एक्यूप्रेशर एक्सपर्ट नुसार कानाच्या खालच्या भागावर मास्टर सेन्सरल अँड मास्टर सेरेब्रल नावाचे दोन इयर लोब्स असतात. या भागावर कान टोचल्याने बहिरेपण दूर होते. कान टोचल्याने डोळ्यांची दृष्टी देखील वाढते. वास्तविक कानाच्या खालच्या भागावर एक प्वॉइंट असतो. या प्वॉइंट पासून डोळ्यांच्या नसा जातात. जेव्हा कानाच्या या प्वॉइंटला टोचले जाते तेव्हा यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत मिळते.

कान टोचल्याने तणाव देखील कमी होतो. कारण कानाच्या खालच्या भागावर दबाव पडल्याने तणाव कमी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर मेंदूच्या इतर समस्यांपासून देखील बचाव होतो. शास्त्रज्ञांनुसार कान टोचल्याने लकवा सारख्या गंभीर आजाराचा धोका देखील खूप प्रमाणात कमी होतो.

कानाच्या खालच्या भागामध्ये असलेले प्वॉइंट आपल्या मेंदूशी जोडलेले असतात. या प्वॉइंटला टोचल्याने मेंदूचा वेगाने विकास होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर मेंदू देखील तल्लख बनतो. यामुळे लहान मुलांचे कान अवश्य टोचले पाहिजेत. जेणेकरून त्यांच्या मेंदूचा विकास वेगाने होऊ शकेल.

कान टोचल्याने पाचन क्रिया देखील सुधारते. कानाच्या ज्या भागावर टोचले जाते तिथे एक प्वॉइंट असतो. हा प्वॉइंट भूख लागण्यासाठी प्रेरित करतो. यामुळे या प्वॉइंटला टोचल्याने पाचन क्रिया देखील सुधारते. त्याचबरोबर लठ्ठपणा देखील कमी होतो. असे मानले जाते कि कान टोचल्याने शरीर सुन्न पडणे आणि पॅरालिसिस सारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने