राजा महाराजांच्या काळामध्ये महिलांना सुंदर आणि चिरतरुण बनून राहण्यासाठी सध्याच्या काळाप्रमाणे कोणतेही पार्लर, क्रीम किंवा साबण शॅम्पू नव्हते. तथापि जुन्या काळामध्ये राण्या खूपच सुंदर दिसायच्या. जुन्या काळामध्ये अनेक मोठ मोठी युद्धे होत होती आणि अनेक युद्धे फक्त राण्यांना मिळवण्यासाठी लढले जात होते. हे तर तुम्हाला चांगलेच माहिती आहे.

जुन्या काळामध्ये जेव्हा राजा महाराजा होते तेव्हा राण्या स्वतःला सुंदर आणि चिरतरुण राहण्यासाठी खूपच मेहनत घेत होत्या कारण एका राजाला अनेक राण्या होत्या आणि जी राणी अधिक सुंदर आणि चिरतरुण आणि आकर्षक असायची, राजा तिच्यासोबतच अधिक वेळ व्यतीत करायचे आणि तीच राणी सर्व संपत्तीची हक्कदार देखील असायची.

अशा स्थितीमध्ये आपले तारुण्य आणि सौंदर्य टिकवण्यासाठी अनेक गोष्टी करायच्या. त्यावेळी कोणतीही सौंदर्य प्रसाधने नसायची पण त्या आपल्या परीने आकर्षक दिसायच्या. आज याचबद्दल जाणून घेणार आहोत कि जुन्या काळामध्ये अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी राण्या काय करायच्या.

जुन्या काळामध्ये राण्या स्वतःला सुंदर आणि चिरतरुण दिसण्यासाठी फक्त प्राकृतिक साधनांचा उपयोग करायच्या. जसे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये दुध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकत असत. ज्यामुळे त्यांचे शरीर कोमल आणि सुंदर व्हायचे आणि त्यांच्या शरीरातून गुलाबाचा सुंगंध यायचा.

कधी कधी राण्या गायीच्या दुधामध्ये थोडे मध मिसळून स्नान करत असायच्या. या राण्यांनी आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम तर केलाच त्याचबरोबर वयाने लहान दिसण्यासाठी तलवारीने लढण्याचा देखील प्रयोग केला.

जुन्या काळामध्ये राण्या आपल्या चेहऱ्याला गोरे करण्यासाठी अंड्यातील पिवळ्या बलकाचा वापर करत असायच्या कारण त्यामुळे त्यांची त्वचा खूपच चमकदार आणि सुंदर होत होती आणि त्या आपल्या चेहऱ्याला चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी त्याचा फेस पॅक बनवून लावायच्या.

त्या दुध, गुलाब जल आणि अनेक औषधी वनस्पतींच्या मिश्रणाचा एक फेस पॅक देखील बनवायच्या आणि याला आपल्या चेहऱ्यावर लावायच्या. ज्यामुळे त्यांची त्वचा एका लहान मुलाप्रमाणे मृदू आणि मुलायम व्हायची. बि-यर केसांसाठी चांगली आहे पण त्वचेसाठी ती इतकी चांगली नाही, असे म्हंटले जाते कि त्या काळामध्ये राण्या सुंदर चेहऱ्यासाठी दुधामध्ये लिंबूचा रस आणि लि-कर मिसळून त्याचा वापर करायच्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने