वास्तुशास्त्रानुसार असे काही पक्षी आहेत जे तुमच्या घरात आल्यास आपल्या कुटुंबावर मोठे संकटे येवू शकतात. गर्भवती महिलांसाठी तर असे पक्षी अजिबात चांगले मानले जात नाही. यातील काही पक्षांनी चुकून आपल्या घरात प्रवेश करू नये. अन्यथा, आपल्या घरासाठी वाईट वेळ येवू शकतो. असा विश्वास आहे की हे पक्षी आपल्या घरात येणे अत्यंत अशुभ आहेत.

प्राचीन काळापासून, लोक घरात काही पक्ष्यांचे आगमन शुभ आणि अशुभ मानतात. तर तुम्हाला हे देखील माहिती असू द्या की ते कोणते असे पक्षी आहेत. जेव्हा ते घरात प्रवेश करतात तेव्हा संपूर्ण घर गरीबीकडे जाते. तर असे देखील काही पक्षी आहेत ज्यांनी आपल्या घरात प्रवेश केला तर आपल्याला श्रीमंत बनवतील.

धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की जर कबुतरांनी किंवा छोट्या चिमण्यांनी जर तुमच्या घरात घरटे केले असेल तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. असा विश्वास आहे की माता लक्ष्मी त्या घरात असल्याचा हा संकेत आहे. अशा घरात कधीही अडचण येत नाही. उलट घर नेहमी आनंदी राहते. आता आपण आपल्या घरावर संकट घेवून येणाऱ्या पक्षांबद्दल जाणून घेवू.

घर संकटात आणणारे पक्षी

१. वटवाघूळ: हिंदू पौराणिक मान्यतानुसार, वटवाघूळ जर घरात शिरले तर त्या घरात रोग आणि मृत्यूचे निवासस्थान होते. त्याच वेळी, बर्या च लोकांचा असा विश्वास आहे की घरात वटवाघुळ शिरल्यास कुटुंबामध्ये भांडणे होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच त्या घरात वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो.

२. कावळा: कावळा घरात वारंवार येणे किंवा आपल्या घरात घरटे बनवणे चांगले मानले जात नाही. त्याच वेळी, स्वप्नांमध्ये कावळ्याचे आगमन देखील अनेक संकेत देऊ शकते. उदाहरणार्थ, कावळाचा आवाज ऐकणे किंवा कावळा घरी बसलेले पाहणे हे कुठूनतरी पाहुणे येण्याचे संकेत असतात.

३. टिटवी: असा विश्वास आहे की ज्या दिवशी टिटवी अचानक झाडावर किंवा कोणाच्या घरात आली तर ते भूकंप होण्याची चिन्हे असतात. कारण टिटवी नेहमी जमिनीवर राहत असते आणि जमिनीवर अंडी घालते. अचानक ती घरी येणे हे चांगले लक्षण नाही.

4. घुबड: आपल्या घरात घुबड पुन्हा पुन्हा एकाच दिशेने येत असेल तर ते फारच अशुभ लक्षण मानले जाते. असा विश्वास आहे की एकदा किंवा दोन वेळा घरात घुबड आल्याने घर आनंदी होते पण जर घुबड घरात वारंवार उपस्थित राहत असेल हे खूप अशुभ असल्याचे मानले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने