सध्या लग्नाचा सीजन सुरु होणार आहे. अशामध्ये अनेक लोक विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत. जेव्हा देखील कोणी विवाह बंधनामध्ये अडकणार असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न उपस्थित होत असतो कि त्याचा होणारा जोडीदार कसा असेल. अनेक मुलांच्या मनामध्ये एकच गोष्ट फिरत असते कि त्याच्या होणाऱ्या पत्नीचा स्वभाव कसा असेल. ती स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबामध्ये ताळमेळ ठेऊ शकेल का?

सर्व जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडू शकेल का? तथापि अशा प्रश्नांची उत्तरे वैवाहिक आयुष्यामध्ये हळू हळू पुढे गेल्यानंतरच मिळतात, पण आज आम्ही अशी माहिती तुम्हाला देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही आपल्या पत्नीचा मुलांक पाहून तिच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. चला तर पाहूयात १ ते ९ मुलांकच्या मुली कशा पत्नी सिद्ध होतात.

ज्या मुलींचा मुलांक १ असतो त्या आपल्या गुणवत्ता, प्रेमळ आणि मनमिळाऊ आणि चांगल्या जोडीदार सिद्ध होतात. त्याचबरोबर व्यवसायामध्ये यांची खास रुची देखील असते. मुलांक २ असणाऱ्या मुली मृदुभाषी, भोळ्या आणि दयाळू असतात. यांना जे मिळते त्यामध्ये त्या संतुष्ट राहतात. यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहत नाही. तथापि अनेक वेळा या आळशीपणाने घेरल्या जातात.

मुलांक ३ असणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीवर पूर्ण अधिकार ठेवतात. या आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये देखील मदत करतात. यांचा आपल्या कुटुंबावर चांगला प्रभाव राहतो. मुलांक ४ असणाऱ्या खूपच शिकलेल्या असतात. यांना सजण्या सावरण्यामध्ये खास रुची राहते. यांना घरातून बाहेर राहण्यात जास्त मजा येते. या आपल्या पतीवर खूप प्रेम करतात.

मुलांक ५ असणाऱ्या स्त्रिया खूपच व्यवस्थित आणि परिपक्व असतात. या आपल्या समस्यांना झुंज देत देखील आपला विकास करण्यात पारंगत असतात. कुटुंबाच्या प्रगतीमध्ये यांची महत्वपूर्ण भूमिका असते. मुलांक ६ असणाऱ्या स्त्रिया रूपवान आणि दयाळू असतात. या एक चांगल्या माता आणि पत्नी सिद्ध होतात. या प्रत्येक स्थितीमध्ये घर चालवण्यात पारंगत असतात. कुटुंबामध्ये सर्व लोक यांचा खूप सन्मान करतात.

मुलांक ७ असणाऱ्या स्त्रिया खूपच प्रतिभाशाली असतात पण आर्थिक स्थितीमुळे या मागे राहतात. यांना आपल्या पतीकडून प्रेमाची इच्छा असते. मुलांक ८ असणाऱ्या स्त्रिया बुद्धिवान, कर्मठ आणि संयमी असतात. या पती आणि मुलांच्या प्रती समर्पित असतात. या व्यवसायामध्ये आपल्या पतीची चांगली मदत देखील करतात.

मुलांक ९ असणाऱ्या स्त्रिया कधी कधी आपल्या मनमौजी स्वभावाचा परिचय देतात. यांना कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्या पतीचा विश्वास जिंकायचा असतो. या भलेहि उग्र स्वभावाच्या असतात पण या कधीच निष्काळजी राहत नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने