हिंदू धर्मातील धर्मग्रंथ आणि पुराणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, जे मानवी जीवनाच्या यशस्वीतेसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी पुरेसे आहेत. या शास्त्रांमध्ये, मानवी जीवनाशी सं-बंधित पुरुष आणि स्त्रीबद्दल बर्या्च गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. या धर्मग्रंथांमध्ये एक सदाचारी स्त्री आणि पुरुष यांचीही ओळख सांगितली गेली आहे.

श्रीहरींच्या विष्णू पुराणात मानवी जीवनाची अनेक रहस्ये सांगितली आहेत. विष्णू पुराणातील एका श्लोकात चांगल्या पत्नीबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, आज आपण त्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. मग चला जाणून घेऊया, कि असे कोणते गुण आहेत जे एका स्त्रीला चांगली पत्नी बनवते.

“सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता” म्हणजेच, एखादी स्त्री जी घरातील कामात निपुण आहे, जी गोड व आकर्षक आहे, ज्या स्त्रीला आपल्या जीवनापेक्षा आपल्या पतीचे जीवन महत्वाचे वाटते आणि जी स्त्री आपल्या पतीची आज्ञा पाळते ती एक चांगली आणि विश्वासू पत्नी मानली जाते.

आपल्या घराचे संगोपन करणारी

विष्णू पुराणानुसार चांगली पत्नी ती स्त्री असते जी घरगुती कामात कुशल आहे तिला आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत व मनोरंजन कसे करावे हे माहित आहे. तसेच, कमी संसाधनांसह ती आपले घर चांगल्या प्रकारे चालविण्यास सक्षम आहे. अशा स्त्रीला सर्वोत्कृष्ट पत्नीचा दर्जा दिला जातो. तसेच, अशी पत्नी एखाद्या पतिला देखील खूप प्रिय असते.

मृदु भाषी

ज्या स्त्रिया नेहमी संयमी भाषा वापरतात. आपल्या पतीशी कधीही तुच्छतेने बोलत नाहीत, अशा स्त्रिया आपल्या पतीला खूप प्रिय असतात. तसेच या महिलांना समाजातही खूप आदर मिळतो. केवळ पत्नीच नाही, तर जो पती आपल्या पत्नीचा सन्मान, आदर करतो त्याच घरात नेहमी आनंददायी वातावरण असते.

आज्ञाधारक पत्नी

ज्या स्त्रीने मनापासून आज्ञांचे पालन केले आहे अशी पत्नी तिच्या पतिला खूप प्रिय असते. अशा जोडीला समाजात खूप आदर मिळतो. तथापि, याचा अर्थ असा नाही की आपण पतीच्या सांगितलेल्या चुकीच्या गोष्टीं सुद्धा केल्या पाहिजेत. जर आपला पति चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणे हे प्रेमळ पत्नीचे कर्तव्य असते.

धर्माच्या मार्गावर चालणारी

रोज पूजाअर्चा करणारी पत्नी धर्माच्या मार्गावर चालणारी असते. अशी पत्नी आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची खूप काळजी घेत असते. धर्मग्रंथांमध्ये अशा पत्नीचे वर्णन सर्वोत्तम पत्नी म्हणून केले गेले आहे. असे म्हणले जाते की ज्याच्या पत्नीमध्ये हे सर्व गुण आहेत तो पुरुष देवराज इंद्रांसारखा असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने