१० नोव्हेंबर मतमोजणीच्या रात्री १.३० वाजता जेव्हा सुरक्षा व्यवस्थेमध्ये तैनात असलेले दोन डीएसपी रस्त्याच्या बाजूला थंडीने कुडकुडत असलेल्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये खायला शोधत असलेल्या एका भिकाऱ्याला पाहिले तेव्हा एका अधिकाऱ्याने बूट आणि आणि दुसऱ्या अधिकाऱ्याने त्याला जॅकेट दिले.

जेव्हा दोन्ही डीएसपी तिथून जाऊ लागले तेव्हा तो भिकारी एका डीएसपीला नावाने बोलावतो, ज्यानंतर दोन्ही अधिकारी हैराण होतात आणि वळून जेव्हा व्यवस्थित त्याला पाहतात आणि ज्यावेळी त्याला ओळखतात तेव्हा ते खूपच आश्चर्यचकित होतात. कारण तो भिकारी त्यांच्या सोबतच्या बॅचचा सब इंस्पेक्टर मनीष मिश्रा होता.

माहितीनुसार १० वर्षापासून तो रस्त्यावर बेवारसपणे फिरत आहे. वास्तविक मनीष मिश्रा यांनी आपले मानसिक संतुलन हरवले. सुरुवातीची ५ वर्षे ते आपल्या घरामध्येच राहिले यानंतर ते घरामध्ये थांबले नाहीत. इतकेच नाही इलाजासाठी ज्या सेंटर आणि आश्रममध्ये त्यांना भरती करण्यात आले तेथून देखील ते पळून गेले होते. सध्या ते रस्त्यावर भिक मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

१९९९ पोलीस बॅचचे अचूक निशाणेबाज

ग्वालियरच्या झासी रोड भागातील रस्त्यावर बेवारस फिरत असलेले मनीष १९९९ मधील पोलीस बॅचचे अचूक निशाणेबाज ठाणेदार होते. मनीष दोघा अधिकाऱ्यांसोबत १९९९ मध्ये पोलीस सब इंस्पेक्टर म्हणून भरती झाले होते.

दोन्ही डीएसपी रत्नेश सिंह तोमर आणि विजय भदोरिया यांनी यावेळी बराच वेळ मनीष मिश्रासोबत जुन्या दिवसांबद्दल बातचीत केली आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मनीष त्यांच्यासोबत जाण्यास तयार नव्हते. शेवटी समाज सेवी संस्थेद्वारे त्यांना आश्रमामध्ये पाठवले गेले जिथे त्यांची उत्कृष्ठरित्या देखरेख केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने