सध्याच्या काळामध्ये बॅलेंस्ड डायट म्हणजेच संतुलित आहारा बद्दल बोलले जाते. पण कोणत्या पदार्थासोबत काय खाल्ले पाहिजे यावर कोणीही लक्ष देत नाही. जसे कि फळ, दही, दुध, सॅलड, डाळ, मीठ आणि अंडी हे सर्व हेल्दी फूड आहेत पण यांचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही हे पदार्थ योग्य पदार्थांसोबत खाता.

आपण अनेक पौष्टिक पदार्थ एकत्र खातो पण तुम्हाला माहिती आहे का कि अनेक पदार्थांच्या मिश्रणाने तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान जास्त होते. आयुर्वेदामध्ये देखील असे म्हंटले गेले आहे कि वेगवेगळ्या स्वभावाचे पदार्थ एकत्र खाऊ नयेत. म्हणजे ज्याचा स्वभाव खूप थंड किंवा गरम, चवीला खारट आणि स्वभाव थंड आणि गरम असेल तर अश्या पदार्थांना एकत्र कधीच खाऊ नये.

आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे कधीच एकत्र खाऊ नयेत. जसे कि दह्यासोबत कधीच आंबट फळे खाऊ नयेत. दोन्ही एकत्र खाल्ल्याने व्यवस्थित पचन होत नाही आणि पोटदुखी सारख्या समस्या होऊ लागतात. तसेच दही हे थंड स्वभावाचे असते यामुळे यासोबत कधीच गरम स्वभावाचे पदार्थ खाऊ नयेत.

जसे कि लोक दही खाल्ल्यानंतर मासे खातात पण असे कधीच करू नये कारण मासे हे गरम स्वभावाचे असतात. आयुर्वेदानुसार चिकन आणि खजूर कधीच एकत्र खाऊ नये हे देखील खूपच हानिकारक असते. आता आपण दुधाबद्दल जाणून घेऊया. जसे कि तुम्हाला माहिती आहे कि दुध एक एनिमल प्रोटीन आहे आणि यासोबत तळलेले, भाजलेले पदार्थ खाल्ल्याने रिअॅक्शन होऊ शकते.

अनेक लोक दुधाच्या चहासोबत खारट पदार्थ खातात पण असे कधीच करू नये. मीठ मिसळळ्यामुळे मिल्क प्रोटीन गोठते आणि पोषणामध्ये कमी येऊ लागते. दुधासोबत लगेच फळे खाऊ नयेत. असे केल्याने दुधामधील कॅल्शियम फळांमधील एंझाइम शोषून घेते आणि यामुळे शरीराला फळांचे पोषक तत्व मिळत नाहीत.

याशिवाय उडीद डाळ, हिरव्या भाज्या, मुळा आणि अंडी, मटन आणि पनीर खाल्ल्यानंतर लगेच दुध पिऊ नये. यामुळे पचन शक्ती कमजोर होऊ शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि मधाला कधीच गरम करून खाऊ नये. मध, लोणी आणि तूप एकत्र कधीच खाऊ नये. अनेक लोक उकडलेल्या अंड्यावर लिंबू पिळून खाणे पसंत करतात, पण असे कधीच करू नये. कारण असे केल्याने आरोग्या संबंधी समस्या होऊ शकतात.

अंडी खाणे कोणाला पसंत नाही? आता तर अंडी प्रेमींनी स्वत:ला एग्गिटेरियनच्या कॅटेगरीमध्ये ठेवले आहे म्हणजे हे लोक मांस नाहीत खात पण अंडी खातात. अंड्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. याला सुपर फूड देखील म्हंटले जाते. अंड्याच्या बलकामध्ये ९० टक्के कॅल्शियम आणि लोह असते. त्याच्या पांढऱ्या भागामध्ये जवळ जवळ अर्धे प्रोटीन असते. हे तर स्पष्ट आहे कि अंडे पोषक घटकांचे सर्वोत्तम स्त्रोत आहे.

पण असे असून देखील हा प्रश्न येतो कि अंडे खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत. उकडलेले अंडे खाल्ल्यानंतर लगेच लिंबू खाऊ नये कारण लिंबू खाल्ल्यानंतर शरीराला खूप नुकसान होऊ शकते. उकडलेले अंडे खाल्ल्यानंतर लिंबू खाल्ल्याने शरीरामध्ये रिअॅक्शन होते त्यामुळे आपल्या शरीराला नुकसान पोहोचते.

यामुळे आपल्या हृदया संबंधीचे आजार देखील होऊ शकतात. ज्या लोकांना किडनीची समस्या आहे त्या लोकांनी उकडलेल्या अंड्यांचे सेवन करू नये. अशा लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंडी खाण्याचा प्रयत्न करावा. अंडे फ्राई करताना किंवा ऑमलेट बनवताना कमी तेलाचा वापर करावा. ज्यास्त तेल हृदयाच्या आरोग्यासाठी ठीक नसते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने