दिवाळीचा पवित्र सण आता जवळ आला आहे. या दिवशी धन संपत्तीची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मी देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतो. जेणेकरून त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल आणि त्यांच्या घरात सुख समृद्धी येईल.

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार घरात कचरा, तुटलेल्या वस्तू ठेवल्यामुळे नकारात्मक उर्जा पसरत असते आणि यामुळे आपणास अन्न आणि धन संपत्ती सं-बंधित अनेक त्रास सहन करावे लागतात. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी या अशा वस्तूंना आपल्या घराबाहेर केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला दिवाळीच्या आधी घराची स्वच्छता करताना कोणत्या वस्तू आपण घरातून काढून टाकल्या पाहिजेत ते सांगणार आहोत.

आपण वापरत नसलेली भांडी तसेच, जे खूप जुने आणि मोडलेले भांडे आहेत. त्यामध्ये कधीही अन्न शिजवू अगर खावू नका. शक्य तितक्या लवकर घरातून अशी भांडी काढून टाकणे चांगले. अन्यथा, घरात भांडणाचे वातावरण राहील.

आपल्या घरातील देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो तुटल्यास तो त्वरित बदला. अन्यथा, आपल्याला आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थितीत दिवाळीपूर्वी त्यांना नदीत विसर्जन करा. तसेच असे फोटो आपण मंदिरात देखील ठेवू शकता. तसेच, घरचे देवघर स्वच्छ करुन दिवाळीची पूजा करावी. तरच देवी लक्ष्मीची असीम कृपा आपणावर राहील.

जर घरात कोणतीही खिडकी, दरवाजा किंवा ड्रेसिंग टेबल किंवा अगदी छोटा ग्लास सुद्धा मोडला असेल तर तो त्वरित बदला. वास्तुशास्त्रानुसार, या मोडलेल्या गोष्टीमुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये भांडणे आणि वाद होतात त्याचबरोबर मानसिक तणाव देखील वाढतो.

बऱ्याचदा लोक टीव्ही, सीडी प्लेयर खराब झाल्यानंतरही ते घराबाहेर टाकत नाहीत. ते घराच्या एका कोपऱ्यात तसेच ठेवतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानले जाते. याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो. तसेच, एखाद्याला जीवनात प्रगती करण्याच्या मार्गात अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

बरेचदा लोक घराच्या जुन्या व निरुपयोगी वस्तू छतावर ठेवतात. पण यामुळे वास्तू दोष निर्माण होतात. हे टाळण्यासाठी, संपूर्ण घरासह घराचे छप्पर सुद्धा स्वच्छ करा आणि कचरा घराच्या बाहेर फेकून द्या.

घरात बंद पडलेले घड्याळ ठेवल्याने आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात. अशा परिस्थितीत, नवीन सुरु केलेले काम अचानक मधेच खराब होऊ लागते. तर दिवाळीपूर्वी असे घड्याळ नीट करून घ्या किंवा ते बदला.

तसेच जुने व फाटलेळे शूज आणि चप्पलमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासह आयुष्यात त्रास देखील वाढतात. अशा परिस्थितीत त्यांना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या.

वास्तुशास्त्राच्या मते, तुटलेले फोटो आणि फर्निचर घरात ठेवणे अशुभ आहे. यामुळे घरात अशांततेसह आर्थिक त्रास होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांना लवकरच घराबाहेर काढा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने