आपल्या सर्वांना माहीतच आहे की धनत्रयोदशी पासून दिवाळी चालू होते आणि तेव्हा पासून घरामध्ये आपण दिवा लावण्यास सुरुवात करतो. परंतु आपल्याला माहित आहे का की धनत्रयोदिवशी कोणत्या चार ठिकाणी दिवा अथवा पणत्या लावायच्या असतात. आपण आज याबद्दलच जाणून घेणार आहोत जेणेकरुन आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतील. तर चला मग जाणून घेऊया की कोणत्या चार ठिकाणी दिवा लावल्यास आपल्या घराची भरभराट होते.

कोणत्या ठिकाणी प्रज्वलित कराव्यात पणत्या

स्मशानभूमीजवळ दिवा लावणे: आपल्याला शक्य असल्यास स्मशानभूमीजवळ त्या दिवशी दिवा अथवा पणती लावल्यास आपल्याला खूपच फायदे होतात. शास्त्रांनुसार असे मानले जाते की स्मशानभूमीजवळ धनत्रयो दिवशी दिवा लावल्यास माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते. शिवाय आपल्या घरातील सर्वं समस्या नाहीशा होतात आणि आपल्या घराची भरभराट होते तसेच आपल्याला सुख व शांती लाभते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर: धनत्रयोदशी दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस दिवा लावावा. धनत्रयोदशीला या ठिकाणी दिवा लावणे खूपच शुभ मानले जाते कारण दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासूनच होते आणि असे केल्याने आपल्याला संपत्तीचा लाभ मिळतो तसेच आपल्या घरातील अकाली मृ त्यू ची भीती देखील नाहीशी होऊन जाते.

पिपळाच्या झाडाखाली: धनत्रयोदशी दिवशी आपण पिपळाच्या झाडाखाली दिवा लावला तर आपल्याला माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतील. असे मानले जाते की सर्व देवी-देवताचे पिपळामध्ये वास्तव्य असते आणि केवळ असे केल्याने आपल्यावर माता लक्ष्मीचे सदैव आशीर्वाद राहतात. तसेच आपल्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

घराच्या बाथरूममध्ये: धनत्रयोदशी दिवशी आपण घराच्या बाथरूममध्ये सुद्धा दिवा लावावा. शास्त्रानुसार असे मानले जाते की देवी लक्ष्मी कोठूनही आपल्या घरात प्रवेश करू शकते. या कारणास्तव, आपण आपल्या घराच्या स्नानगृहात देखील दिवा लावावा. असे केल्यास माता लक्ष्मी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देते आणि सदैव आपल्या पाठीशी उभी राहते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने