आजकाल, बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत आणि हे कुठेना कुठे आपल्या बदलत्या लाईफस्टाईलचाच परिणाम आहे. होय आपल्यापैकी बरेच लोक पैसे कमवण्यासाठी दिवसभर बाहेर असतात आणि अशामध्ये ते आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत.

जे लोक आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत त्यांना या समस्यांचा सामना करावा लागतो. पण आता तुम्हाला अशा समस्यांचा सामना करावा लागणार नाही कारण आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्या दूर करू शकता.

आपण दररोज पांढऱ्या मिठाचा वापर करत असतो कारण मिठाशिवाय कोणतेही अन्न स्वादिष्ठ बनू शकत नाही. म्हणजे मिठाशिवाय कोणतेही अन्न चवदार नसते. पण आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या मिठाबद्दल नाही तर काळ्या मिठाचे फायदे सांगणार आहोत.

काळे मीठ एक आयुर्वेदिक मसाल्याच्या रुपामध्ये वापरले जाते. हे बद्धकोष्ठता, पोट खराब होणे, पोट फुगणे, सूज, लठ्ठपणा, थायरॉईडमध्ये खूपच उपयोगी असते. अशामध्ये जर तुम्ही निरोगी आयुष्य जगू इच्छित असाल तर आजपासून पाण्यामध्ये काळे मीठ मिसळून प्यायला सुरुवात करा. पाण्यासोबत काळे मीठ घेतल्याने ब्लड शुगर देखील ठीक होते. पण एक गोष्ट लक्षात असू द्या कि काळे मीठ फक्त लिमिटमध्ये वापरावे नाहीतर याचा लाभ मिळत नाही.

काळ्या मिठाच्या नियमित वापराणे पचन क्रिया दुरुस्त होते आणि तोंडामध्ये लाल डाग देखील येत नाहीत. वास्तविक काळ्या मिठाच्या सेवनाने आपले पोट ठीक राहते. तुम्ही हवे तितके भोजन करा, पण काळ्या मिठाच्या सेवनाने हे भोजन सहजरीत्या पचन होते. याशिवाय काळे मीठ लठ्ठपणा देखील दूर करते.

पांढऱ्या मिठाच्या वापराणे आपल्याला जास्त फायदा मिळत नाही कारण आपण फक्त अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी याचा वापर करतो. पण जर काळ्या मिठाचा वापर केल्यास हे आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक ठरते.

काळ्या मिठाच्या सेवनाने स्नायू दुखणे आणि सांधेदुखीपासून देखील आराम मिळतो. वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी एक कप काळे मीठ एखाद्या सुती कपड्यामध्ये बांधून घ्या आणि याला गरम करून वेदनेच्या ठिकाणी शेक द्यावा. असे दिवसातून दोन तीन वेळा करावे, तुम्हाला वेदनेमधून आराम मिळेल.

याशिवाय जर तुम्हाला नेहमीच गॅसची समस्या येत असेल तर एका मातीच्या भांड्यामध्ये काळे मीठ टाकून ते चांगले गरम करावे, जेव्हा हे काळे मीठ पाण्यामध्ये रूपांतरित होईल तेव्हा हे पाणी प्यावे. यामुळे तुमची गॅसची समस्या देखील दूर होईल आणि पोट देखील हलके होईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने