आपल्या सर्वांना तर हे चांगलेच माहिती आहे कि आजच्या काळामध्ये सर्व काही बदलले आहे. तर काही वस्तूंचा काळ अजून कधीच संपलेला नाही. जुन्या काळापासून आजच्या काळापर्यंत देखील या वस्तू जश्या आहेत तशाच वापरल्या जातात जशा पहिला होत्या.

मग कितीही फॅशन आणि ग्लॅमरसच्या गोष्टी होत असतील पण या वस्तूंमध्ये काही वस्तू आज देखील अशा आहेत ज्या जुन्या काळापासून चालत आल्या आहेत. ज्यामध्ये एक आहे महिलांद्वारे आभूषण म्हणून घातल्या जाणाऱ्या बांगड्या. हि गोष्ट तर आपल्या सर्वांना माहिती आहे कि याला खूपच जास्त महत्व दिले जाते आणि एक महिलेच्या जन्मापासून ते तिच्या मृत्यू पर्यंत त्याची महत्वाची भूमिका राहते.

अनेक ठिकाणी तर काही असे देखील धर्म आहेत जे मुलगी जन्माला आल्यानंतर लगेच शकून म्हणून चांदीच्या बांगड्या घालतात. बांगड्या अनेक प्रकारच्या असतात आणि प्रत्येक बांगडीचे वेगळे महत्व आहे. सर्वात पहिला बांगड्यांचा संबंध विवाहित स्त्रियांशी जोडला जातो. तसे तर भारतीय महिलांची वेशभूषा देखील खूपच रंजक आहे. विवाहित महिलांची खासकरून खूपच वेगळी असते. विवाहित महिलांचा खूप सारा शृंगार असतो.

प्रत्येक विवाहित महिला आपला शृंगार आपल्या पतीसाठी करत असते. गळ्यामध्ये मंगलसूत्र, माथ्यावर सिंदूर आणि हातामध्ये बांगड्या या तीन गोष्टी प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी करत असते. एका विवाहित स्री हसाठी बांगड्या फक्त शृंगारचे आभूषण नाहीत तर यामागे अनेक कारणे आहेत. लग्नानंतर स्त्रियांना सोन्यापासून बनलेल्या बांगड्यापेक्षा काचेच्या बांगड्या घालण्यास सांगितले जाते.

अशी देखील मान्यता आहे कि काचेच्या बांगड्या परिधान केल्याने पती आणि मुलांचे आरोग्य खूप चांगले राहते आणि यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील लपले आहेत. इतकेच नाही तर असे देखील सांगितले जाते कि बांगड्या परिधान केल्याने आसपासचे वातावरण आणि आरोग्यावर देखील प्रभाव पडतो. बांगड्या वातावरणामध्ये असलेल्या नकारात्मक उर्जेला आपल्याकडे खेचतात आणि यासोबत स्त्रीच्या विभिन्न शारीरिक अंगांवर एक वेगळा दबाव बनवतात ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.

याशिवाय बांगड्यासंबंधी अनेक सारे विपरीत प्रभाव देखील होतात जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप जरुरीचे आहे. अशी मान्यता आहे कि बांगड्यांचे तुटणे त्या स्त्रीसाठी किंवा तिच्यासंबंधी लोकांसाठी एक अशुभ संकेत देते.

याशिवाय बांगड्यांच्या तुटण्यासोबत त्यामध्ये तडा देखील जाणे अशुभ मानले जाते. असे देखील सांगितले जाते कि स्त्रीला अशा बांगड्या काढून टाकण्याच्या सल्ला दिला जातो कारण असे मानले जाते कि बांगड्यांमध्ये तडा गेल्यावर देखील बांगड्या काढून टाकल्या नाहीत तर त्याचा महिलेच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने