पुराणामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे कि मृत्यूनंतर आत्म्याचा आपल्या कुटुंबातील सदस्य, निवास स्थान, प्रिय वस्तूंवर मोह बनून राहतो. फळस्वरूप ते या वस्तूंच्या आसपास भटकत राहतात. तुम्ही ऐकले असेल कि अंतिम संस्कार करून येते वेळी लोकांना सूचना दिली जाते कि त्यांनी मागे वळून पाहू नये आणि सरळ चालत राहावे. तुम्ही कधी विचार केला आहे का कि असे का केले जाते? यामागे कोणते कारण आहे? आज आम्ही तुम्हाला यामागचे कारण सांगणार आहोत.

अंतिम संस्कारानंतर परतताना मागे वळून पाहिल्याने आत्म्याचा आपल्या कुटुंबाप्रती मोह तुटू शकत नाही. यासोबतच आत्म्याला या गोष्टीचा संदेश देखील पोहोचतो कि त्याच्या प्रती अजून देखील तुमचा मोह कमी झालेला नाही. यामुळे कधी कधी मागे वळून पाहण्याची चूक न करण्याचा सल्ला दिला जातो.

जेव्हा मृत शरीराला अग्नी दिला जातो तेव्हा या माध्यमातून आत्म्याला असे समजावले जाते कि आता त्याचे या जगाशी काही देणे घेणे नाही राहिले. त्याचा हिशेब चुकता झाला आहे. आता त्याच्या शरीराशी त्याचा काहीही संबंध राहिलेला नाही आणि त्याच्या कुटुंबियांसोबत देखील त्याचा कोणताही संबंध राहिलेला नाही. त्याचे आता एक वेगळे जग आहे जिथे परतणेच त्याच्यासाठी उचित आहे.

संसाराच्या मायेचा त्याग करणे सोपे नसते, यामुळे आत्म्याला मुक्ती मिळण्यास खूप अवघड जाते, त्यावर जर कुटुंबातील एखाद्या सदस्याने अंतिम संस्कार करून येताना मागे वळून पाहिल्यास आत्म्याचे त्याच्या कुटुंबियांशी आकर्षण कमी न होता उलट जास्त वाढते आणि परलोक गमन करण्यास त्याला खूप कष्ट होते. जर कोणी हि चूक करतो तर मृतकाची आत्मा आपल्या कुटुंबियांसोबत मागे-मागे परत येते.

कधी कधी ती जिवंत व्यक्तीच्या शरीरामध्ये देखील प्रवेश करून त्याला त्रास देऊ लागते. लहान मुले किंवा गर्भवती महिला आत्म्यांच्या प्रभावामध्ये लवकर येतात. या कारणामुळे लहान मुले आणि गर्भवती महिलांना स्मशानभूमीपासून दूर ठेवले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने