भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड दर महिन्याला निवृत्त क्रिकेटपटूंना पेन्शन देते. २००४ पासून बीसीसीआयने निवृत्त क्रिकेटपटूंना पेन्शन देण्यास सुरवात केली. २००४ च्या या पेन्शन योजनेनुसार असे म्हटले आहे की १७४ माजी खेळाडूंना प्रति खेळाडू दरमहा ५००० रुपये मिळतील. ही योजना त्या सर्व खेळाडूंना लागू होते ज्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी आपले अनमोल योगदान दिले आहे. पण ज्या खेळाडूंनी फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे ते खेळाडू या योजनेचा भाग नव्हते.

२०१५ मध्ये बीसीसीआयने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या मासिक भत्तेत वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार, २५ कसोटी सामने खेळणार्या् आणि ३१ डिसेंबर १९९३ पूर्वी निवृत्ती घेतलेल्या क्रिकेटपटूंना दरमहा ५०,००० रुपये मिळतील. त्याचबरोबर १ जानेवारी १९९४ नंतर निवृत्त झालेल्या खेळाडूंना दरमहा २५,००० रुपये मिळत आहेत आणि २००३ ते २००४ पर्यंत खेळलेल्या खेळाडूंना दरमहा ३०,००० रुपये पेन्शन मिळते.

नुकतेच या संदर्भात माजी खेळाडूंनी बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना यांना पत्र लिहिले होते, त्यांनी सीओएला हा विषय निकाली काढण्याची विनंती केली होती. खन्ना यांनी सीओएला आपल्या ईमेलमध्ये लिहिले होते कि बीसीसीआय आपल्या क्रिकेटर्सची पूर्ण काळजी घेतो आणि बीसीसीआयकडून माजी क्रिकेटपटूंना अपेक्षा आहे.

निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या निवृत्तीवेतनातील दुरुस्तीबाबत चर्चा झाली आहे आणि २०१५ मध्येच ही रक्कम बदलली गेली होती आणि खेळाडू यात सुधारणा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने