झी मराठी या प्रसिद्ध वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेला आता एक नवीन वळण मिळणार आहे. लवकरच या मालिकेमध्ये दर्शकांना नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मालिकेमधून एक्झिट घेतलेली नंदिताची भूमिका पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

पण यावेळी नंदिताची भूमिका धनश्री काडगावकर साकारणार नसून दुसरीच अभिनेत्री आपल्याला नंदिताच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. नंदिताच्या भूमिकेमध्ये कोणती अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे याबद्दल सध्या दर्शकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. सध्या नंदिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हि प्रेग्नंट असून तिने मालिकेमधून काढता पाय घेतला आहे.

आता तुझ्यात जीव रंगला मालिकेमध्ये नंदिताच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री माधुरी पवार पाहायला मिळणार आहे. झी युवा या वाहिनीवरील अप्सरा आली या शोची विजेता ठरलेली माधुरी खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. माधुरीला नृत्याची विशेष आवड असून सोशल मिडियावर देखील तिचे असंख्य चाहते आहेत. आपल्या नृत्यामधून ती दर्शकांना नेहमी मंत्रमुग्ध करते.

मुळची सातारामधील असलेली माधुरी आपल्या आईवडिलांच्या सपोर्टमुळे नृत्यामध्ये पारंगत झाली. तिच्या वडिलांचे नाव ज्योतिराम पवार असून ते गवंडी काम करतात. त्यामुळे ते कधीही एका गावामध्ये स्थायिक नसत. यादरम्यान त्यांनी आपल्या मुलीला नृत्याचे प्रशिक्षण दिले. पुढे माधुरीनेने अनेक नृत्य स्पर्धा जिंकत नाव गाजवले.

नृत्यासोबत माधुरी पवार अभिनय देखील उत्कृष्ठ साकारते. अजय गोगावले यांच्या पावसाळी या ढगांनी या म्युझिक व्हिडीओमध्ये ती अभिनय करताना पाहायला मिळाली आहे. आता तुझ्यात जीव रंगला मालिकेमधून माधुरीची एक नवीन झलक पाहायला मिळणार आहे. वहिनीसाहेबांच्या रुपामध्ये पाहण्यासाठी दर्शक खूपच उत्सुक आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने