हिंदू धर्म शास्त्रानुसार यावेळी शारदीय नवरात्रची सुरुवात १७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षच्या प्रतिपदा तिथी पासून सुरु होत असलेल्या नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते. हे नऊ दिवस माता दुर्गाला समर्पित होतात.

या दिवसांमध्ये भक्त मातेचा चौक सजवतात, व्रत ठेवतात, त्यांच्या घर आणि मंदिरामध्ये विधिवत पूजा अर्चना केली जाते. सर्वत्र आईचा जयजयकार ऐकायला मिळतो. पूर्ण वातावरण भक्तीमय होऊन जाते, पण यावेळी नवरात्रीला विशेष संयोग बनत आहे. हा संयोग जवळ जवळ ५८ वर्षांनंतर बनत आहे.

यावेळी नवरात्रीला ५८ वर्षांनंतर शनी स्वराशी मकर आणि गुरु स्वराशी धनुमध्ये विराजमान राहील. त्याचबरोबर घटस्थापनेचा देखील विशेष संयोग बनत आहे. या वर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त १७ ऑक्टोबर म्हणजे शनिवारच्या सकाळी ६ वाजून १० मिनिटापासून ते सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राहणार आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच घटस्थापना केली जाते. यादरम्यान अखंड ज्योती प्रज्वलित करून मातेची विधिवत पूजा केली जाते. मातेची पूजा पहिल्या दिवसापासूनच सुरु केली जात.

ज्योतिषशास्त्रानुसार जर काही कारणास्तव आपणास निश्चित मुहूर्तावर घटस्थापना करणे शक्य नसेल तर कोणत्याहि वेळी किंवा वास्तू नुसार घरातील पूजा स्थळ जर उत्तर-पूर्व दिशेला असेल तर याच दिशेला घटस्थापना करावी. एका चौकी वर लाल रंगाचे वस्त्र हाथरून त्यावर कुंकुवाने स्वस्तिक बनवावे. यानंतर माता दुर्गाची प्रतिमा स्थापिक करावी, अखंड ज्योती प्रज्वलित करावी आणि घटस्थापना करावी.

यावेळी नवरात्रीला राजयोग, दिव्य पुष्कर योग, अमृत योग, सर्वार्थ सिद्धि योग आणि सिद्धि योगचा देखील संयोग बनत आहे जो नवरात्रीला अधिक विशेष बनत आहे. नवरात्रीमध्ये माता दुर्गाची पूजा करतेवेळी मातेला लाल वस्त्र, फळ आणि फुल अर्पित करावे यामुळे माता प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने