गांधारी हे महाभारतातल्या सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक होते. तिने शिव शंकराची कठोरपणे आराधना केली होती आणि यामुळेच तिला एक वरदान प्राप्त झाले होते की जर तिने तिच्या डोळ्यावरील पट्टी काढून ज्याला देखील न ग्न अवस्थेत पाहिलं, त्याचे शरीर वज्रासामान बनेल.

एकदा असेच गांधारीने आपल्या मुलाला म्हणजेच दुर्योधनाला वज्राप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गांधारी आपला मुलगा दुर्योधनाला म्हणाली कि, हे पुत्र तू गंगेला जा आणि तेथे स्नान कर आणि थेट तिथून माझ्याकडे ये, पण तू जा अवस्थेमध्ये जन्मला होता त्याच अवस्थेमध्ये तु माझ्याकडे ये. तेव्हा दुर्योधन म्हणतो आई निर्वस्त्र अवस्थेत? तेव्हा गांधारी म्हणते की हो मी तुझी आई आहे आणि तुला आपल्या आईशी कोणत्याही प्रकारची लज्जा करू नये. आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करणे दुर्योधन आपले कर्तव्य मानतो आणि आंघोळ करुन तो आपल्या आईकडे येत असतो.

परंतु त्यांना वाटेत श्रीकृष्ण गाठ पडतात आणि दुर्योधनाकाडे पाहत श्रीकृष्ण म्हणतात की आपण या अवस्थेत कसे? आपण आपले कपडे कोठे विसरलात? तेव्हा दुर्योधन म्हणतो की आंघोळ करून या अवस्थेमध्ये मला माझा आईने त्यांच्यासमोर बोलावले आहे. याक्षणी श्री कृष्णाला खूप हसू येते आणि म्हणतात की तुम्ही त्यांचे पुत्र आहात पण आता तुम्ही वयस्कर झाले आहात आणि या अवस्थेमध्ये कोणताही पुत्र त्याच्या आईसमोर जात नाही. भरतवंशांची तर हि परंपरा नाही. नंतर श्री कृष्ण हसतात आणि दुर्योधनाला म्हणतात जा आपल्या आईला जास्त प्रतीक्षा करायला लावू नये.

श्री कृष्णाने दुर्योधनाला जानुनबुझून खूप गोंधळात टाकले होते. यानंतर, दुर्योधन त्याच्या गु प्तांगांवर केळीची पाने बांधतो आणि तसेच तो त्याचा आई समोर जातो व आईला म्हणतो कि आई मी आंघोळ करुन आलो आहे. तेव्हा गांधारी म्हणते कि ठीक आहे मी काही क्षणांसाठी माझ्या डोळ्यावरची पट्टी काढत आहे.

जेव्हा गांधारी तिच्या डोळ्याची पट्टी काढते तेव्हा तिच्या डोळ्यांचा प्रकाश दुर्योधनाच्या शरीरावर पडतो. तेव्हा दुर्योधनाचे शरीर वज्रासारखे कठोर बनते, परंतु त्याचा गु प्तांगावर असलेल्या केळीच्या पानांमुळे तो भाग दुर्बल राहतो. तेव्हा गांधारीने दुर्योधनाला असे येण्याचे कारण विचारले तेव्हा दुर्योधन म्हणतो की मी माझ्या आईसमोर निर्वस्त्र कसे होईन.

तेव्हा गांधारी दु:खी होऊन पुन्हा तिच्या डोळ्यावर पट्टी बांधते आणि ती दुर्योधनाला म्हणते की माझ्या दृष्टीक्षेपामुळे तुझे शरीर वज्रासारखे कठोर, बलवान व ताकदवान झाले असते, परंतु ज्या भागावर माझी दृष्टी पडत नाही तो भाग दुर्बल राहील. जर तू असे केले नसते तर सदैव अजिंक्य राहिला असतास. हे ऐकून दुर्योधन म्हणतो की मी आता ही पाने काढून टाकतो. मग गांधारी म्हणते की मी कोणी मायावी नाही आहे. मी फक्त एकदाच माझ्या शक्तीचा वापर करू शकत होते.

तेव्हा दुर्योधन म्हणतो की तुम्ही याबद्दल काळजी करू नका. मी उद्या भीमविरुद्ध युध्द करेन आणि, गदा युद्धाच्या नियमांनुसार कंबरेच्या खाली प्रहार करणे निषिद्ध आहे. यामुळे हे युद्ध मीच जिंकेन आणि शेवटी भीम दुर्योधनाच्या मांड्या उखडवून त्याचा व ध करतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने