सपना चौधरी आज एका सुपरस्टारप्रमाणे जीवन जगते आहे. पण एक काळ असा होता की जेव्हा तिच्या कुटुंबाची आर्थिक हालत खूपच नाजूक होती. तेव्हा सपनाचे वडील खूप आजारी असायचे, उपचार व औषधांसाठी तिला अगदी तिचे घर सुद्धा गहाण ठेवावे लागले होते. तेव्हा सपनाने सुरुवातीला काही रुपयांसाठी नाचगाणे करण्यास सुरूवात केली आणि काही काळाने तिला एका शोसाठी ३१०० रुपयांपर्यंत पैसे मिळू लागले. पण सपनाचे नशिब पालटले आणि आज ती एक लक्झरी आयुष्य जगत आहे.

लाखों चाहते तिच्यासाठी वेडे आहेत

मुळची हरियाणाची असलेली सपना चौधरी दिल्लीमध्ये राहते. सपनाच्या चौधरीची क्रेझ इतकी आहे की लोक लाखोंच्या संख्येने तिची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. सपना ही एक सोशल मीडिया सेंसेशन आहे.

आता ती आई झाली आहे, पण लोक या कारणामुळे हैराण आहेत कि तिने तिचे लग्न तर लपवलेच पण तिने आपली प्रेग्नंसी देखील लपवली. सपना चौधरीने मॉडल-अभिनेता वीर साहूसोबत गुपचूप जानेवारी २०२० मध्ये कोर्ट मॅरेंज केले आणि आज ते दोघेही एका मुलाचे पालक आहेत.

रोहतकची जटनी आहे जटनी

सपना चौधरीचा जन्म २५ सप्टेंबर १९९० रोजी हरियाणाच्या रोहतक येथे झाला होता. सपना चांगली डांसर तर आहेच त्यासोबत ती उत्कृष्ठ गायिका आणि अभिनेत्री देखील आहे. हरियाणवी सपनाच्या नृत्याचा प्रवास स्टेजवर नाच्ण्यापासून ते बिग बॉसच्या स्टेज पर्यंत पोहोचला.

एका स्टेज शोसाठी सपना चौधरी आज साधारणत ४-५ लाख रुपये घेते. अशा परिस्थितीत ती महिन्याभराच्या कार्यक्रमांतून कोट्यावधी रुपये कमवते. दिल्लीच्या नजफगडमध्ये कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यात सध्या ती वास्तव्यास आहे.

लक्झरी कार

सपना चौधरी हिला लक्झरी गाड्या खूप आवडतात. तिच्याकडे ऑडी ते फॉर्च्यूनर पर्यंतच्या आलिशान कार आहेत. सपना सोबत एक बाउन्सर देखील नेहमीच असतो जो तिचे नेहमी संरक्षण करत असतो. सपना चौधरी हिच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती जवळपास १५० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. सपना हे आज एक नावाजलेले नाव आहे आणि तिने अपार कष्टानंतर हे स्थान मिळवले आहे. सपनाने आज पर्यंत कधी तिच्या डोक्यावर यशाचे भूत चढू दिले नाही आणि ती कोणता दिखावा सुद्धा करत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने