रुपेरी पडद्यावरील संजय दत्तच्या बायोपिक चित्रपटात रणबीर कपूरने एका भक्कम व्यक्तिरेखेने संजय दत्तच्या संपूर्ण आयुष्यातील वेदनादायक कथा प्रेक्षकांसमोर मांडली. संजय दत्तची कथा जितकी रंजक होती तितकीच वेदनादायक सुद्धा होती. पण संजय दत्तच्या कथेमध्ये प्रेक्षकांना काय आश्चर्य वाटले असेल तर ते म्हणजे त्याची प्रेम प्रकरणे. संजय दत्तने आयुष्यात अनेक प्रेम प्रकरणे केलीत आणि तीन विवाह देखील केले. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या सुंदर पत्नीची ओळख करुन देणार आहोत, ज्यांना पाहून तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रेमात पडाल. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील त्याच्या तीन पत्नींबद्दल...

पहिली पत्नी

संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा होती. या दोघांनी १९८७ मध्ये लग्न केले आणि १९८८ मध्ये रिचाने त्रिशाला नावाच्या मुलीला जन्म दिला. पण काही काळानंतर ब्रे न ट्यू म रमुळे रिचा शर्माचे दुःखद निधन झाले. त्रिशाला आता आपल्या आजी आजोबांसोबत अमेरिकेत अगदी आनंदाने राहत आहे.

दुसरी पत्नी

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर संजय दत्त रिया पिल्लईच्या प्रेमात पडला आणि या दोघांनी १९९८ मध्ये लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २००५ मध्ये या दोघांच्यामधील तणावामुळे त्यांचा घटस्फोट झाला. २००२ मध्ये संजय दत्तने नादिया दुर्रानी सोबत कांटे चित्रपटात काम केले होते ज्यात तो तिच्या प्रेमात पडला होता आणि याच कारणांमुळे रिया पिल्लई यांनी संजय दत्तला सोडले होते.

तिसरी पत्नी

खडतर आयुष्य आणि कठीण प्रवासानंतर २००८ साली त्याने मान्यता दत्तशी लग्न केले. २०१० मध्ये मान्यताने एक मुलगा आणि मुलगी असलेल्या जुळ्या मुलांना जन्म दिला. आता मान्यता संजय दत्तचे प्रोडक्शन हाऊस सांभाळत आहे आणि संजय दत्तसह अगदी आनंदाने ती राहत आहे. मान्यता दत्तने यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने