जो व्यक्ती सकाळी लवकर उठून तुळशीला पाणी आर्पण करतो, त्या व्यक्तीला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचे आशीर्वाद नेहमीच मिळतात आणि त्या व्यक्तीला जीवनातील सर्व सुख मिळते आणि त्यांची सर्व पापे नष्ट होतात.

आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या रोपाबद्दल काही खास आणि सोप्या उपायांबद्दल सांगणार आहोत, जे केल्यानंतर तुम्हाला धन लाभ होईल. हिंदू शास्त्रानुसार, तुळशीची आठ नावे सांगितली गेली आहेत. जो कोणी या नावाचा जप करतो त्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.

प्रत्येकाचा घरात तुळशीचे रोप असते, परंतु जर आपण त्यासोबत काळ्या धोत्र्याचे रोप लावले तर ही दोन्ही रोपे आपल्याला आणखी शुभ परिणाम देतात. बहुतेच लोकांच्या घरात आपण तुळशीचे रोप पाहिले असेल पण जर आपण त्यासह काळ्या धोत्र्याचे रोप लावले आणि त्या दोघांना दररोज स्नान घातले तर किंवा शुद्ध पाणी आणि कच्चे दूध अर्पण केले तर आपल्याला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पूजेच्या समान फळ मिळतील. आपल्याला पैशाशी सबंधित कोणतीही समस्या होणार नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. काळ्या धोत्र्याबद्दल बोलायचे झाले तर ते भगवान शंकराचे एक रूप मानले जाते.

प्रत्येक प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व आहे, म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा तुळशीची पाने परमेश्वराला अर्पण करा. अशाप्रकारच्या उपासनेमुळे तुम्हाला धन प्राप्ती होते. तसेच मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशीची पाने ठेवल्यास त्याला मोक्ष प्राप्ती होते. अनेक प्रयत्नांनंतरही आपल्या व्यवसायात प्रगती होत नसेल तर आपणास हे उपाय केले पाहिजेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळ्या तुळशीची आवश्यकता असेल. आपण हा उपाय कोणत्याही गुरूवारी करू शकता, आपण गुरुवारी काळ्या तुळशीची पाने तोडून पिवळ्या कपड्यात बांधून ती आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवली तर आपल्याला खूप चांगले परिणाम दिसतील.

हराळी एक खास गवत असते जे तुळशीच्या आसपास पाहायला मिळते कारण तुळशीला पवित्र मानले जाते. अशामध्ये तुळशीच्या आसपास हराळी किती प्रभावित असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. याला जर पिवळ्या कपड्यामध्ये आपल्या घरात बांधून ठेवले तर व्यवसायामध्ये वृद्धी होते. आणि आपल्या घरामध्ये ज्या समस्या बऱ्याच काळापासून सुरु आहेत त्यादेखील संपुष्टात येतील.

जेव्हा तुम्ही तुळशीला जल आर्पण कराल तेव्हा ॐ तुलसी नम मंत्राचा जप करावा. जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल सुद्धा घालावे आणि तुळशीला जल आर्पण करत असताना एखादी स्त्री दिसल्यास तिला कुंकू लावावे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीच्या रुपाला देखील कुक लावायला हवे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने