रामाने जेव्हा सीतेच्या शोधात लंकेवर आक्रमण केले होते तेव्हा रावण त्यांच्याकडे असलेल्या सामर्थ्याने, ज्ञानाने आणि मायावी शक्तीमुळे अहंकारी बनला होता. त्याचा अंत जवळ आला आहे हेही त्याला उमगत नव्हते. रामाच्या हातून जेव्हा रावण मारला गेला, तेव्हा तो रणांगणात खूप बेचेन होता तो अखेरचा श्वास घेत होता.

श्रीरामांना माहित होते की रावण एक ज्ञानी आणि विद्वान आहे. त्यांनी लक्ष्मणला रावणाकडे जाण्यास सांगितले आणि त्यांच्याकडून जीवनाचे काही मौल्यवान धडे घ्यायला सांगितले. आज आम्ही तुम्हाला मरण पावताना रावणाने दिलेल्या तीन महत्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या गोष्टी सध्या खूप उपयुक्त आहेत.

रामाची आज्ञा लक्ष्मण टाळू शकला नाही आणि रणांगणात रावणाला भेटण्यासाठी तो पोचतो आणि त्याच्या मस्तकाजवळ उभा राहतो. तो तिथे थोडावेळ उभा राहतो, पण रावण काही बोलत नाही. तेव्हा लक्ष्मण तेथून परत येतो आणि रामाला सांगतो की रावण काही बोलत नाही आहे.

लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभा असतो. तेव्हा रामाला ही गोष्ट समजते व ते म्हणतात की जेव्हा जेव्हा आपण कोणाकडे ज्ञान घेण्यासाठी जातो तेव्हा आपण नम्रपणे त्याला विनंती केली पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे. तेव्हा राम लक्ष्मणला पुन्हा रावणाकडे जायला सांगतो. यावेळी लक्ष्मण रावणाच्या पायाजवळ उभा राहतो.

मोठ्या भावाच्या म्हणण्यानुसार लक्ष्मण रावणाच्या पायाजवळ उभे राहिले आणि त्यांना जीवनाचे काही धडे देण्यास सांगितले. रावणानं, वेदनांनी विव्हळत लक्ष्मणला पाहिले, तेव्हा त्यांनी आपल्या जीवनातील तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

रावणाने लक्ष्मणला सांगितले की जीवनात जे काही चांगले करायचे आहे, त्यासाठी उशीर करू नका. तुमच्या कडून काही अशुभ कार्य होणार असल्यास ते जास्तीत जास्त टाळावे. रावण म्हणाला की, साक्षात् नारायण स्वरूप श्रीराम यांना मी ओळखू शकलो नाही. त्यांच्या शरण येऊ शकलो नाही. त्याचा परिणाम असा झाला आहे की आज मी रणांगणात मरण पावत आहे.

रावणाने लक्ष्मणला इतर अनेक महत्वाचा गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की आपल्या आयुष्यातील कोणतीही गुप्त गोष्ट किंवा रहस्य इतर कोणलाही सांगू नये. त्याने ही चूक केली. विभीषणला त्याच्या मृत्यूचे रहस्य माहित होते, म्हणूनच तो आज या अवस्थेत होता. त्याने विभीषणला आपल्या मृत्यूचे रहस्य प्रकट केले नसते तर आज त्याचा मृत्यू झाला नसता. विभीषण यांनी श्री रामाला सांगितले होते की रावणाच्या नाभीमध्ये त्याचा मृत्यू आहे, तेथे प्रहार करुनच त्याचा मृत्यू होईल.

रावण म्हणाला की तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूंला किंवा विरोधकांला कधीही लहान व निकृष्ट समजू नये. पण रावणाने ही चूक केली होती. तो रामाला एक सामान्य आणि तुच्छ मानत होता. म्हणूनच तो आज या अवस्थेत होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने