मोरपंख श्रीकृष्णाला अतिप्रिय असण्यासोबतच याचा संबंध देवी लक्ष्मी, देवी सरस्वती, इंद्र देव ई. या देवतांसोबत आहे. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रसोबत इतर अनेक धर्मांमध्ये देखील याला शुभतेचे प्रतिक मानले गेले आहे.

अशी मान्यता आहे कि मोर पंख घर, दुकान आणि ऑफिसमध्ये लावल्याने कधीहि सुख-शांती येण्यासोबतच अन्नधान्याची आणि धनाची कमी होती नाही. त्याचबरोबर कुटुंबामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहते. चला तर जाणून घेऊया कि मोरपंखासंबंधी वास्तू उपाय आणि यासोबत काही आणखी रंजक गोष्टी.

देवी-देवतांशी संबंध

हिंदू धर्मासोबत मोराचा संबंध देवी सरस्वती, महालक्ष्मी, इंद्र देव, कार्तिकेय, श्री गणेश, श्रीकृष्ण ई. देवतांच्या सोबत मानला गेला आहे. अशामध्ये यांना मोरपंख अतिप्रिय असल्यामुळे मोराचे पंख घर, दुकान आणि ऑफिसमध्ये लावल्याने शुभफळाची प्राप्ती होते. पौराणिक काळामध्ये मोरपंखांपासूनच कलम तयार केले जाते असे. याद्वारे मोठ-मोठ्या धार्मिक ग्रंथांची रचना केली गेली आहे.

लक्ष्मी आणि सरस्वती देवीशी संबंध

जर हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाले तर मोराचे पंख देवी लक्ष्मी आणि सरस्वतीसोबत जोडले गेले आहे असे मानले गेले आहे कि याला घरामध्ये लावल्याने अन्न आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही. त्याचबरोबर घराच्या सदस्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होते.

ग्रीक मध्ये मोराच्या पंखाचा स्वर्गाशी संबंध

ग्रीकच्या पौराणिक कथांनुसार, याचा संबंध हेरासोबत मानला जातो. अशी मान्यता आहे कि आर्गस ज्याला जवळ जवळ १०० डोळे होते. त्याच्याद्वारेच हेराने मोराची संरचना केली होती. याच कारणास्तव मोराचा संबंध स्वर्ग आणि ताऱ्यांसोबत मानला जातो.

आशियायी देशांचे मोरपंखाशी संबंध

आशियातील अनेक देश मोरपंखाला अध्यात्माशी संबंध मानतात. त्यांच्यानुसार क्वान-यिनचा मोरासोबत खोल संबंध आहे. ते मोराच्या पंखाला प्रेम, खुशहाली आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानतात.

क्लेश-कलह दूर होईल

ज्या घरांमध्ये पती-पत्नी मध्ये नेहमी भांडणे होत असतात त्यांनी आपल्या बेडरूममध्ये मोरपंख अवश्य लावावा. यामुळे दोघांमधील दुरावा दूर होऊन नात्यामध्ये मधुरता येईल. बासरीमध्ये मोरपंख ठेवल्याने देखील पती-पत्नींमध्ये प्रेम वाढते.

शत्रू होतील दूर

मंगळवार किंवा शनिवारच्या रात्री हनुमानजीघ्या मस्तकावरील सिंधूर घेऊन त्याद्वारे मोरपंखावर शत्रूचे नाव लिहून घराच्या पूजास्थळी ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते मोरपंख वाहत्या पाण्यामध्ये सोडावे. असे केल्याने शत्रूंपासून लवकर सुटका मिळू शकते.

धनलाभासाठी

घराच्या दक्षिण दिशेला असलेल्या तिजोरी मध्ये मोराचे पंख उभे करून ठेवेल्याने आर्थिक समस्यांपासून लवकर सुटका मिळते. त्याचबरोबर धना संबंधी अनेक समस्या देखील दूर होतात.

आरोग्य

जर घरातील सदस्यांचे आरोग्य नेहमी बिघडत असेल तर अशामध्ये मोर पंखाची पूजा करून घराच्या पूर्व आणि उत्तर-पश्चिम दिशेला भिंतीवर लावावे. याशिवाय याला आपल्या खिश्यामध्ये किंवा डायरीमध्ये ठेवल्याने देखील याचा फायदा मिळू शकतो.

सफलतेचे रस्ते खुले होतील

एखाद्या राधा-कृष्ण मंदिरामध्ये जाऊन श्रीकृष्णाच्या मुकुटावर मोरपंख लावावा. जवळ जवळ ४० दिवसांनंतर ते मोरपंख घेऊन आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे. असे केल्याने आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन सफलतेचे सर्व रस्ते खुले होतील.

वाईट नजरेपासून बचाव

एक चांदीच्या ता वीजमध्ये मोरपंख ठेऊन हे ता वीज नवजात शिशुला घालावे. असे केल्यास वाईट नजरेपासून नवजात शिशुचा बचाव होईल. नवजात शिशूंना सर्वात जास्त वाईट नजर लागत असते. त्यामुळे असे केल्यास खूप फरक पडतो.

सकारात्मक ऊर्जा

घराच्या मेन गेटवर तीन मोरपंख लावून त्याच्या खाली ॐ द्वारपालाय नम: जाग्रय स्थापयै स्वाहा मंत्र लिहून त्याच्या खाली गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावावा. असे केल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.

सर्व वास्तुदोष दूर होतील

घराच्या आग्नेय कोण म्हणजे दक्षिण आणि पूर्व दिशेच्या मध्ये मोर पंख लावल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. यासोबत घराच्या ईशान्य कोणामध्ये श्रीकृष्णाचा मोरपंखासोबत फोटो किंवा पेंटिंग लावणे देखील शुभ मानले जाते.

कीटकां पासून सुटका

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे कि मोरपंख घराच्या भिंतींवर लावल्याने पाली आणि कीटकांपासून सुटका मिळते. मोरपंख घरामध्ये लावल्यास कीटक दूर जातात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने