शास्त्रांमध्ये स्त्री घराची लक्ष्मी मानली जाते. लग्नानंतर ती ज्या घरामध्ये जाते त्या घराचे भाग्य तिच्यासोबत जोडले जाते. जर तिने मनात आणले तर ती तुमचा घराला स्वर्ग बनवू शकते. परंतु बर्यााच वेळा स्त्रिया जाणीवपूर्वक आणि नकळत अशा चुका करतात ज्यामुळे तिच्या पतीच्या प्रगतीतही अडचणी निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महिलांनी कोणती कामे केल्यामुळे पतीची प्रगती खालावते. तर मग चला जाणून घेऊया.

सकाळी उशिरा उठणे

स्त्री ही घरची लक्ष्मी असते. अशामध्ये स्त्रियांनी सकाळी लवकर उठून पूजा करावी. पण ज्या घरात स्त्रिया सकाळी उशीरा उठतात. तेथे देवी लक्ष्मी कधीही राहत नाही. तसेच महिलांनी सूर्यास्तानंतर कधीही झोपू नये. यामुळे केवळ पैशाची कमतरताच उद्भवत नाही तर पतीची प्रगती देखील खालावते.

नाकावर राग असणे

शास्त्रात असे सांगितले गेले आहे की शांत स्वभावाच्या स्त्रिया आपल्या घराला स्वर्ग बनवतात. तर त्यांचा राग सर्व काही उद्धवस्त करू शकतो. अशा परिस्थितीत स्त्रियांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे कधीही चांगले.पण ज्या घरात कलह, क्लेश असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही राहत नाही.

झाडूला लाथ मारणे

झाडूला लाथ मारल्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. कारण हे तिचेच रूप आहे. एवढेच नव्हे तर यामुळे घरात दारिद्र्यही येते. म्हणून कधीही झाडूला लाथ मारू नका. याशिवाय घरातल्या स्त्रियांनी कधीही कचरा आणि खरकटी भांडी घरात जास्त वेळ ठेवू नयेत. कारण यामुळे देखील माता लक्ष्मी नाराज होते. त्याचबरोबर हे कंगाली सोबतच अनेक समस्यांचे कारण देखील बनते.

या वस्तू कधीही कोणाला देऊ नका

विवाहित महिलांनी कुंकू, पैजण, बांगड्या अशा वस्तू कधीही कोणाला देऊ नयेत. यामुळे केवळ आपल्या नात्यातील प्रेमच कमी होणार नाही तर यामुळे आर्थिक नुकसानही होईल. बर्यायचदा महिलांना अशी सवय असते, ते अशा वस्तू इतरांना वापरण्यास देतात आणि त्या दुसऱ्यांच्या वस्तू वापरतात. अशावेळी कपड्यांचा विषय ठीक आहे, परंतु काही स्त्रिया इतरांना कुंकू देखील देतात,जे शास्त्रात चुकीचे सांगितले गेले आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या सौभाग्याची निशाणी कधीही कोणाला देऊ नये.

सूर्यास्तानंतर ही कामे करू नयेत

महिला दिवसभर घराची साफसफाई वैगेरे करतात आणि अशा वेळी त्या संध्याकाळी आंघोळ करतात. तर काही वेळा स्त्रिया संध्याकाळी केस देखील धुतात आणि विंचरतात. परंतु सूर्यास्तानंतर स्त्रियांनी केस विंचरु नयेत आणि घरातून तुटलेले केस बाहेर टाकू नयेत. याचा घरावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच सूर्यास्तानंतर झाडू देखील मारू नये. तसेच सूर्य मावळल्यानंतर कोणालाही उधार देऊ नये. तसेच दिवस मावळल्यानंतर कोणालाही दूध, दही, कांदा आणि लसूण अशा वस्तू देऊ नये. याने आपल्या घराची लक्ष्मी दुसर्या्च्या घरात जाते असे मानले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने