नवरात्री दुर्गा मातेची उपासना करण्यासाठी खूप खास व शुभ मानले जातात. यावेळी शारदीय नवरात्र १७ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होत आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत दुर्गा मातेची मनोभावे पूजा व अर्चना करण्यात येईल. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची नऊ रूपातील, विधिवत प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते. नवरात्रीचे दिवस दुर्गा मातेला खूप प्रिय असतात.

असे म्हटले जाते की जर नवरात्रीच्या दिवसात दुर्गा मातेची अंतरमनाने पूजा केली गेली तर ती भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. जर तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या या शुभ दिवसात दुर्गा मातेला प्रसन्न करायचे असेल तर यासाठी काही उपाय आपण अवलंबु शकता. जर आपण काही सोपे उपाय केले तर दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्या सर्वं इच्छा आकांक्षा पूर्ण करेल.

नवरात्रीत दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

घरातील अनेक समस्या दूर होतील

काही कारणास्तव घरात अनेक समस्या असल्याचे अनेकदा दिसून येते. दररोज काही ना काही वादविवाद आपल्या घरात चालू असतात. जर आपल्याला घरातील त्रास दूर करायचे असतील तर नवरात्रीच्या दिवसात सुपारीच्या पानांवर केसर ठेवा.

त्यानंतर दुर्गा मातेसमोर पूर्ण भक्तीभावाने दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा आरती म्हणावी व काही वेळ दुर्गा मातेचा जाप करावा. आपण हा उपाय केल्यास, आपल्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होईल, ज्यामुळे घरातील सर्व प्रकारचे त्रास आणि वाद दूर होतील. आपण नऊ दिवस हा उपाय अगदी काळजीपूर्वक करावा.

पैशाशी सं-बंधित अडचणींपासून मुक्तता होईल

जर आपली आर्थिक परिस्थिती खराब असेल आणि अनेक प्रयत्न करूनही आपली अडचणींपासून मुक्तता होत नसेल, तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढील पाच दिवसांपर्यंत दररोज सुपारीच्या पानांवर 'श्री' लिहून ते पान दुर्गा मातेला अर्पण करावे. नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यावर ती अर्पण केलेली पाने आपल्या घरातील तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या जागी ठेवल्यास पैशाशी सं-बंधित सर्वं समस्या दूर होतात.

धनाची आवक वाढण्यासाठी

जर आपल्या हातात पैसे राहत नसतील आणि त्यामुळे आपण खूप अस्वस्थ झाला असाल तर नवरात्रीत आपण पानावर लाल गुलाब ठेऊन दुर्गा मातेला अर्पण करावा. हा सोपा उपाय केल्यास आपल्या घरात धनाची आवक वाढू लागेल. तसेच माता दुर्गाकडून सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी.

नोकरी व व्यवसायात पदोन्नती मिळवण्यासाठी

जर आपल्याला नोकरी किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर नवरात्रीच्या दिवशी एक पान घेऊन त्या पानांवर दोन्ही बाजूला मोहरीचे तेल लावा आणि मग ते दुर्गा मातेला मनोभावे अर्पण करा. यानंतर रात्री झोपताना हे पान आपल्या उशाला ठेवून झोपा. दुसर्याा दिवशी सकाळी उठून हे पान दुर्गा मातेच्या मंदिरामागे ठेवून या. हा उपाय केल्यास नोकरी व व्यवसायात पदोन्नती मिळण्याची शक्यता असते आणि आपल्या कामकाजातील सर्व अडथळे दूर होतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने