भारतीय संघाचा प्रसिद्ध खेळाडू सौरव गांगुली आपण सर्वांना माहित आहेच. कधी विराट आणि अनुष्का तर कधी हरभजन-गीता बसरा, युवराज सिंग आणि हेजल कीच कित्येक खेळाडूंनी अभिनेत्रींशी लग्न केले आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांचे नावही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीशी जोडले गेले आहे. सौरव गांगुलीच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच पर्सनल आयुष्यही खूप मजेशीर राहिले आहे. ऑगस्ट १९९६ मध्ये त्याने डोना गांगुलीशी कुटूंबियांची परवानगी नसताना सुद्धा लग्न केले होते. जी त्यांच्या घराच्या शेजारी राहत होती.

सौरव गांगुली आणि नगमा यांची पहिली भेट १९९९ च्या विश्वचषका दरम्यान झाली होती. तिने बॉलिवूडच्या जग्तामधून राजकारणामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवरही हे दोघे बर्याूच वेळा पाहिले गेले होते. जवळपास १८ वर्षानंतर एका मुलाखतीत नगमाने गांगुलीशी असलेले आपले सं-बंध आणि ब्रेकअप यांच्याबद्दल खुलासा केला आहे.

जेव्हा २००० मध्ये त्याच्या एकमेकांना डेट केल्याच्या बातम्या येत होत्या तेव्हा त्या दोघांनीही यावर काहीही भाष्य केले नव्हते. पण जवळजवळ १० वर्षांनंतर नगमा म्हणाली की त्यांचे रिलेशन होते. जेव्हा सौरवचे नाव नगमाशी जोडले गेले होते तेव्हा तो त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर होता आणि तो फलंदाजीमध्येही बराच प्रसिद्ध झाला होता. शिवाय तो भारतीय संघाचा कर्णधारही होता.

नगमा पुढे म्हणाली की आमच्या बद्दल बरेच काही सांगितले गेले होते पण आम्ही कोणाशी काही बोललो नाही. नगमाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा २००० मध्ये गांगुलीची कारकीर्द शिखरावर होती, तेव्हा टीम इंडियाचा पराभव आणि कर्णधाराची खराब कामगिरी चाहत्यांना सहन करता येत नव्हती. त्याचा आमच्या नात्यावरही परिणाम झाला.

ती म्हणाला की त्याच्या करियरचा प्रश्न होता, म्हणून दोघांपैकी कोणालातरी वेगळे व्हावे लागले. अशा परिस्थितीत सौरवला आपल्या करियरला महत्व देणे योग्य वाटले. तो म्हणाला की मोठ्या फायद्यासाठी छोट्या फायद्याशी तडजोडी करावी लागते.

यानंतर ती म्हणाली की, गांगुलीचा निर्णय अगदी योग्य होता. कोणत्याही खेळाडूची कामगिरी मैदानावर पाहिली जाते, जर ती योग्य नसेल तर संघाची सर्व जबाबदारी त्या खेळाडूंवर टाकली जाते. ती म्हणाली की आम्ही आमच्या स्वत:च्या इच्छेनुसार ब्रेकअप केला होता. तिने हे देखील सांगितले कि त्यांनी हे रिलेशन कटुतेने संपवले नाही. दोघे आजही एकमेकांचा सन्मान करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने