तुम्ही ‘जिसका कोई नहीं होता, उसका खुदा होता है’ ही म्हण नक्कीच ऐकली असाल. लोक संकटात असताना बरेचदा देवाची आठवण काढतात आणि जर मनापासून आपण देवाकडे प्रार्थना केली असेल तर देव त्याला वाचवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देवदूत पाठवितो असे आपण मानतो.

आज आपण अशी एक घटना बघणार आहोत ज्यानंतर आपणही या म्हणीवर विश्वास ठेवण्यास सुरुवात कराल. आजही जगात चांगल्या माणसाची कमतरता नाही आणि आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची कहाणी सांगणार आहोत.

आज या लेखामध्ये आपण एका गरीब व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत जो रिक्षा चालवतो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. बबलू गेली अनेक वर्षे रिक्षा चालवत आहे. साधारण ८ वर्षांपूर्वी जेव्हा तो रिक्षातून एका ठिकाणी जात होता, तेव्हा एका व्यक्तीने त्याला बोलावले आणि आपल्या मुलीला रिक्षात बसवले आणि काळजीपूर्वक शाळेत सोडण्यास सांगितले आणि बबलू त्या मुलीला शाळेत घेऊन जाऊ लागला.

रिक्षा थोडी पुढे गेली होतीच की ती मुलगी अचानक मोठ्याने ओरडू लागली. बबलूला काही समजण्यापूर्वी ती मुलगी रिक्षातून खाली उतरली आणि वेगाने रे ल्वे रु ळां कडे पळत सुटली. बबलूही तिच्या मागोमाग धावू लागला कारण त्या मुलींची जबाबदारी बबलूवर होती, म्हणूनच त्याने त्या मुलीचा पाठलाग केला.

पण बबलूला लक्षात आले की रे ल्वे रु ळा च्या मध्यभागी उभी असलेली ही मुलगी आ त्म ह त्या करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा बबलू त्या मुलीला असे का करीत आहे हे विचारतच राहिला, पण त्या मुलीने त्याला काही सांगितले नाही.

तेव्हा त्या मुलीने बबलूला खूप वाईट बोलले आणि त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्या मुलीने ना ला य क, अ न प ढ असे संबोधून बबलूचा खूप अ प मा न केला पण बबलूने त्या मुलीला एकटे सोडले नाही. काही वेळाने त्या मुलीला त्याने समजावून आपल्या घरी आणले. परंतु त्या मुलीने बबलूला खूप फटकारले आणि घराबाहेर काढले आणि म्हंटले की तुझे अ प श कु नी तोंड पुन्हा कधीही मला दाखवू नको. पण बबलूने त्या मुलीला सुखरूप रित्या तिच्या घरी सोडले.

या घटनेला ८ वर्षे झाली. असेच एक दिवस रिक्षा चालवताना बबलूचा भीषण अ प घा त झाला. जवळपासचे लोक त्याला दवाखान्यात घेऊन गेले. पण जेव्हा बबलूला जाग आली तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या शेजारी एक डॉक्टर उभी आहे. पण बबलूवर उपचार करणारी ती डॉक्टर इतर कोणी नव्हती तर तीच मुलगी होती जिचा बबलूने ८ वर्षांपूर्वी जी व वाचवला होता.

जेव्हा लोकांनी विचारले की ती बबलूला ओळखते का, तेव्हा ती मुलगी सर्वांसमोर म्हणाली की ते माझे वडील आहेत. ती मुलगी म्हणाली कि ८ वर्षापूर्वी जर त्यांनी माझा जी व वाचवला नसता तर ती कधीही डॉक्टर होऊ शकली नसती. हे ऐकून बबलू खूप भावूक झाला आणि दोघेही तेव्हा खूप रडले. आज बबलू आणि त्या मुलगीमध्ये वडील-मुलीचे असे सुंदर नाते आहे आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे दोघेही नक्कीच भेटतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने