आपल्या देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या प्रेमकथेबाबत अजूनही चर्चा असते. मुकेश आणि नीता अंबानी यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, मुकेश अंबानी यांनी मुंबईतील व्यस्त पेड्डर रोडवर गाडी थांबवून लग्नासाठी मागणी घातली होती. मुकेश अंबानी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.

यासोबतच नीता अंबानी यांनी लग्नाचा प्रस्ताव फेटाळला असता तर आपण काय केले असते हेही त्यांनी सांगितले. मुलाखतीमध्ये या प्रश्नावर मुकेश अंबानी म्हणाले होते की, "मी लग्न करण्यास नकार दिला असता तर तुम्ही काय केले असते, असे नीता अंबानी यांनी मला विचारले." माझे उत्तर असे होते की तसे असते तर मी नीताला तिच्या घरी सोडले असते आणि आम्ही पुन्हा एकदा मित्र बनून राहिलो असतो.

तेव्हा मुकेश अंबानी म्हणाले की, हो असे झाले असते तर ही परिस्थिती नक्कीच आली असती. अंबानी कुटूंबाची सून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाले असे विचारले असता नीता अंबानी म्हणाल्या की तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असे काहीही बदललेले नाही. कारण की वस्तुतः त्यांचे कुटुंब आणि अंबानी कुटुंबाची संस्कृती आणि मूल्ये एकमेकांसारखे होती. नीता अंबानी म्हणाल्या की मी या कुटुंबात एक सून नाही तर एक मुलगी म्हणून आले होते.

आपल्याला कदाचित माहित नसेल पण, नीता अंबानी यांचे ही सासरे धीरूभाई अंबानी यांच्याशी चांगले सं-बंध होते. या मुलाखतीतच नीता अंबानी यांनी सांगितले होते की ते नेहमी मला सकाळी राजकारण, रिलायन्स इंडस्ट्रीज या सर्व विषयांवर प्रश्न विचारत असत.

वास्तविक नीता अंबानी यांना एका सांस्कृतिक कार्यक्रमात धीरूभाई अंबानी आणि त्यांची पत्नी कोकिलाबेन यांनी नाचताना पाहिले होते आणि तेव्हाच ते प्रभावित झाले होते. असे म्हंटले जाते की यावेळी धीरूभाई अंबानी यांनी तिला आपल्या कुटुंबाची सून बनविण्याचा निर्णय घेतला होता आणि दुसर्याधच दिवशी त्यांना भेटायला बोलावले होते.

विशेष म्हणजे, नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांना उत्कृष्ट बॉन्डिंगसाठी ओळखले जाते. लग्नानंतरही नीता अंबानी यांनी शिक्षक म्हणून काम करण्याचे ठरविले तेव्हा मुकेश अंबानी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला होता.

एवढेच नव्हे तर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही नीता अंबानी खूप अॅिक्टिव्ह आहेत. रिलायन्समध्ये स्पोर्ट्स वेंचर म्हणून काम करण्याव्यतिरिक्त, त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आहेत आणि या ग्रुपच्या कॉरपोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी देखील त्या सांभाळतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने