हिंदू धर्मामध्ये शरद पौर्णिमेला खास महत्व आहे. हा दिवस प्रत्येक वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षच्या पौर्णिमेला येतो. असे मानले जाते कि या रात्री चंद्र आपल्या किरणांनी अमृत वर्षा करत असतो. त्याचबरोबर हा दिवस देवी लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

अशी मान्यता आहे कि या दिवशी माता पृथ्वीवर आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येते. अशामध्ये जर आपण देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करू इच्छित असाल तर ज्योतिष आणि वास्तूशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय करू शकता. चला तर जाणून घेऊया त्या उपायांबद्दल.

स्वच्छतेची काळजी घ्या

अशी मान्यता आहे कि ज्या घरामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करते. त्याचबरोबर घरामध्ये धन संपत्तीची कधीच कमतरता भासत नाही. अशामध्ये आपल्या घरामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी जरूर घ्यावी.

तुळशी मातेच्या समोर लावावा दिवा

माता लक्ष्मी आणि श्रीहरीला तुळशीचे रोप अत्यंत प्रिय मानले जाते. अशामध्ये शरद पौर्णिमेला सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून तुळशी मातेला जल अर्पित करावे. नंतर तुपाचा दिवा लावून सिंधूर लावावा. त्यानंतर पांढऱ्या रंगाची मिठाई नैवैद्य दाखवावा. अशाप्रकारे तुळशी मातेची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि श्रीहरीची कृपा आपल्या कुटुंबावर नेहमी बनून राहील.

चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवा खीर

चांदीच्या भांडयामध्ये खीर बनवून ती शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी या खिरीचे सेवन करावे. असे मानले जाते कि पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामधून अमृताचा वर्षाव होतो. अशामध्ये याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते.

रात्रभर जागरण करावे

अशी मान्यता आहे कि या रात्री माता लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येते. अशामध्ये संपूर्ण रात्र जागण्यासोबत माता लक्ष्मी आणि श्रीहरीचे नाम जपावे. यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होऊन अन्न धान्न्याची कमी दूर होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

माता लक्ष्मीची पूजा

शास्त्रांनुसार या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस असतो. अशामध्ये या दिवशी अंतर्मनाने माता लक्ष्मीची पूजा केल्याने कर्जामधून मुक्ती मिळते. अशामध्ये हा दिवस कर्जमुक्त पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. अशामध्ये कर्जामधून मुक्ती मिळण्यासोबत आर्थिक स्थिती देखील मजबूत करण्याची संधी उपलब्ध होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने