गेल्या काही काळापासून कोरोणा संक्रमणमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये चित्रपट बनण्यासोबत कलाकारांची लग्ने देखील थांबली आहेत, आता चित्रपटांची शुटींग सुरु झाली आहे आणि तर कलाकार देखील आपल्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत, मिडिया रिपोर्ट्सनुसार सिंघमची अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच बिजनेसमन गौतम किचलूसोबत सात फेरे घेणार आहे.

लवकरच होणार लग्न

मिडिया रिपोर्ट्सनुसार काजल अग्रवाल अनेक दिवसांपासून गौतमसोबत इंगेज्ड होती. लवकरच दोघे लग्नाच्या बंधनामध्ये अडकणार आहेत. गौतम किचलू एक आंत्रप्यनोर इंटीरियर डिजाइनर आहे. असे म्हंटले जाते कि काजल आणि गौतमचे लग्न मुंबईमध्ये थाटात होणार आहे.

हे लॉकडाउननंतर पहिले मोठे सेलिब्रिटी वेडिंग होणार आहे. असे म्हंटले जात आहे कि लग्नाचे फंक्शन दोन दिवस चालणार आहे आणि यामध्ये कुटुंबातील लोकांशिवाय खास मित्रांना देखील आमंत्रित केले जाणार आहे.

अरेंज्ड लव्ह मॅरेज

काजल आणि गौतमच्या रिलेशनशिपबद्दल जास्त माहिती समोर आलेली नाही, पण असे म्हंटले जात आहे कि हे अरेंज्ड लव्ह मॅरेज आहे. काजल अग्रवालने २०१४ मध्ये एका छोट्या भूमिकेमधून क्यूं हो गया ना चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

साउथ चित्रपटांमध्ये लोकप्रिय

काजल अग्रवाल साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव आहे. तिने तमिळ, तेलगु शिवाय इतर अनेक भाषेंच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. काजलने रोहित शेट्टीच्या सिंघम चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पुनरागमना केले. या चित्रपटामधून तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने स्पेशल २६ आणि दो लफ्जों की कहानी सारखे चित्रपट देखील केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने