वास्तूशास्त्रातील उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत. असे म्हंटले जाते कि शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे कि एखाद्या स्थानी उर्जा परिवर्तन आणून तेथील स्थितीमध्ये परिवर्तन आणले जाऊ शकते. असे म्हंटले जाते कि वास्तू शास्त्रामध्ये धन प्राप्तीचे उपाय केल्याने खूपच लवकर धन प्राप्ती होऊ शकते. ज्या लोकांना लवकर धन प्राप्तीची इच्छा असते त्यांनी हे उपाय अवश्य करावे.

पूर्व दिशेला पिवळा रंग: घराच्या पूर्व दिशेला पिवळा रंग असायला हवा. विशेष करून पूजा स्थळी पूर्व भिंतीला पिवळा रंग जरूर असावा. असे म्हंटले जाते कि पूर्व दिशेला पिवळा रंग असल्याने धन प्राप्तीचे योग बनायला सुरुवात होते. म्हणून जे लोक लवकर धन प्राप्ती करू इच्छितात त्यांनी हा उपाय जरूर करावा.

घरच्या तिजोरीमध्ये तांदूळ अवश्य ठेवावे: एक लाल कपडा घ्या. त्यामध्ये घरच्या मुख्य सदस्याच्या हाताने सव्वा मुठ तांदूळ ठेवा. पुन्हा कपड्याला गाठ बांधून माता महालक्ष्मीचे नाम स्मरण करून आपल्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवा. अशी मान्यता आहे कि वास्तू शास्त्रचा हा उपाय केल्याने धन प्राप्तीचे योग बनण्यास सुरुवात होते. थोड्या-थोड्या काळानंतर हे गाठोडे पाहत राहावे जर यामधून तांदूळ बाहेर येत असतील तर पुन्हा गाठोडे बनून तिजोरीमध्ये ठेवा.

मनी प्लांट सर्वात खास: वास्तू शास्त्राच्या धन प्राप्तीच्या उपायांमध्ये मनी प्लांट सर्वात खास मानले गेले आहे. असे म्हंटले जाते कि या रोपाचे नाव यामुळे मनी प्लांट ठेवले गेले कारण यामध्ये अशी उर्जा असते जी घरामध्ये धन खेचून आणते. धन प्राप्तीसाठी इच्छुक लोकांनी आपल्या घराच्या ईशान्य भागामध्ये मनी प्लांट अवश्य ठेवावे. जर याची पाने सुकण्यास सुरवात झाली तर याला लगेच बदलून नवीन रोप लावावे.

घरामध्ये स्वच्छता ठेवा: असे म्हंटले जाते कि ज्या घरामध्ये स्वच्छता नसते त्या घरामध्ये नकारात्मकतेचा वास असतो. ज्यामुळे घरामध्ये दरिद्रता पसरते. यामुळे ज्या लोकांची हि इच्छा आहे कि त्यांच्या घरामध्ये धनाचे आगमन व्हावे त्यांनी आपल्या घरामध्ये सर्वात आधी स्वच्छता ठेवणे खूप महत्वाचे आहे. विशेष करून घराच्या कोपरऱ्यांमध्ये आणि भिंतीची स्वच्छता जरूर करावी. घरच्या कोणत्याही भागामध्ये धूळ बसू देऊ नका.

छतावरील भंगार हटवा: बहुतेक लोक आपल्या घरामधील भंगार छतावर ठेवतात. पण वास्तू शास्त्रामध्ये असे मानणे आहे कि असे करू नये. छतावर भंगार ठेवल्याने घरामध्ये दरिद्रता येते. जर तुम्हाला वाटत असेल कि आपल्या घरामध्ये धनाचे आगमन व्हावे तर आपल्या घराच्या छतावरून शक्य तितक्या लवकर भंगार काढून टाकावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने