दही खाणे हे खूप आरोग्यदायी आहे, दह्यापासून बर्यानच प्रकारचे पदार्थ बनवले जातात. दही अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी खूप फा-यदेशीर मानले जाते. बर्याहच लोकांना जेवताना दही खाणे आवडते. भारताच्या उत्तरे पासून ते दक्षिणे पर्यंत आणि पूर्वे पासून ते पश्चिमे पर्यंत दही वेगवेगळ्या प्रकारे सेवन केले जाते. परंतु आम्ही तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहोत जी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची अशी आहे.

कांदा

बर्यााच लोकांना दही सोबत कांदा खाण्याची आवड असते, बर्याहच वेळा आपण घरी कोशिंबीर बनवतो ज्यामध्ये आपण कांदा व दही घालतो. पण कांदयासोबत दही खाणे योग्य नाही. दही थंड असते, तर कांदा शरीरात उष्णता निर्माण करतो. जेव्हा या दोन गोष्टी एकत्र खाल्या जातात तेव्हा त्याचे शरीरावर अनेक हानिकारक परिणाम होतात. बऱ्याच लोकांना त्वचेची एलर्जी होते, त्यातून शरीरावर पुरळे येणे यासारख्या समस्या उद्भवतात.

मासे

दही आणि मासे एकत्र खाणे खूप हानिकारक आहे. अन्न तज्ञ असेही म्हणतात की कधीही दोन प्रकारचे प्रथिने असलेले स्त्रोत एकत्र खाऊ नयेत. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्यास पोटाचे अनेक विकार निर्माण होऊ शकतात.

आंबा

दही आणि आंबादेखील एकत्र खाणे टाळावे. आंब्याच्या छोट्या तुकड्यां सोबत दही खायला अनेक जणांना आवडते. परंत दही हे थंड असते तर आंबा हा उष्ण असतो, त्यामुळे या हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतात.

उडीद डाळ

उडीद डाळ दही सोबत खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होते. ज्यांना दही-खिचडीचा आनंद घ्यायला आवडतो त्यांना हे माहितच असेल की जर तुम्ही रात्री हे सेवन केलात तर पोटदुखी आणि अॅ्सिडिटी सारख्या समस्या निर्माण होतात.

दूध

दही दुधापासून बनविले जाते परंतु दही आणि दूध मिक्स करून लगेच त्याचे सेवन करू नये. अॅीसिडिटी आणि गॅस सारख्या अनेक समस्या आपल्याला उद्भवू शकतात. तसेच दही कधीही तेलकट पदार्थासोबत खाऊ नये. असे केल्यास आपले शरीर आळशी व कमजोर बनते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने