बॉलीवूड अभिनेत्री आणि विवादित शो बिग बॉस ६ मध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री सना खानने फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला आहे. तिने अध्यात्मचा मार्ग स्वीकारला आहे. तिने सोशल मिडियावर याचा खुलासा करताना लिहिले कि आता अ ल्ला हच्या सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून मानवतेची सेवा करणार.

अभिनेत्री सनाच्या अगोदर देखील अनेक अभिनेत्रींनी फिल्म इंडस्ट्री सोडून अध्यात्मचा मार्ग स्वीकार आहे. अशाच फिल्म इंडस्ट्रीमधील काही इतर देखील अभिनेत्री आहेत ज्यांनी अध्यात्मचा मार्ग स्वीकारून इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये त्या पूर्णपणे गुंतून गेल्या. अशामध्ये आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.

बरखा मदान

अभिनेत्री बरखा मदानने ४ नोवेंबर २०१२ रोजी फिल्मी जगत सोडून सन्यास घेतला होता. असे नाही कि हा निर्णय तिने आर्थिक तंगी, करियरमधील अडथळे किंवा हृदयभंगानंतर हा निर्णय घेतला. असे म्हंटले जाते कि २००२ मध्ये धर्मशाला मधील एका इवेंटदरम्यान जेव्हा तिने दलाई लामा जोपा रिपोंचे यांना ऐकले तेव्हा तिने निर्णय घेतला कि ती देखील नन बनेल.

जेव्हा तिने हि इच्छा दलाई लामा यांच्यासमोर सांगितली तेव्हा ते म्हणाले कि, तुझे बॉयफ्रेंड सोबत भांडण झाले आहे का. मठामध्ये राहण्याचा हा अर्थ होत नाही तुम्ही एखाद्यापासून दूर जाल. यानंतर बरखाला बौद्ध धर्म दर्शन शास्त्र सोबत जुडण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याचा मुख्य उद्देश बरखाला या गोष्टीचे ज्ञान अवगत करणे होता कि तिला नन बनण्याचा मार्ग का निवडायचा आहे.

यानंतर बरखाने स्वतःची प्रोडक्शन कंपनी स्थापन केली आणि त्या बॅनरखाली दोन चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे सोच लो (२०१०) आणि दुसरा सुरखाब. २०१२ मध्ये पुन्हा एकदा बरखा काठमांडू स्थित बौद्ध मठात पोहोचली तेव्हा तिला पुन्हा हाच प्रश्न विचारण्यात आला कि सर्व काही ठीक असून देखील काही तरी हरवत आहे. ४ नोवेंबर २०१२ रोजी सकाळी ९ वाजता तिने सन्यास घेतला.

जायरा वसीम

लोकप्रिय अभिनेता आमिर खानसोबत चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री जायरा वसीमने गेल्या वर्षी जूनमध्ये फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णय घेतल्यामुळे सर्वजण हैराण झाले होते. दंगल चित्रपटामधून डेब्यू करणारी जायराने तीन चित्रपटांमध्ये काम केले होते. तिचे म्हणणे होते कि तिला या प्रोफेशनमध्ये आनंद मिळाला नाही कारण यामुळे तिला तिच्या धर्माचे अनुसरण करण्यास अडचण येत होती.

ममता कुलकर्णी

९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली ममता कुलकर्णीने साध्वी बनून सर्वाना हैराण केले होते. २०१३ मध्ये तिने आपले पुस्तक ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी रिलीज केले होते. यादरम्यान फिल्मी जगताला निरोप देण्याचे कारण सांगताना ममता कुलकर्णी म्हणाली कि काही लोक जगाच्या कामासाठी जन्म घेतात, तर काही लोक ईश्वरासाठी जन्म घेतात. मी देखील ईश्वरासाठी जन्मले आहे.

अनु अग्रवाल

१९९० मध्ये आलेल्या आशिकी चित्रपटामधून अनु रातोरात स्टार बनली होती. या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण ती सफल झाली नाही. यादरम्यान १९९९ मध्ये एका रोड अ प घा ताने अनुची संपूर्ण लाईफ बदलली. या अ प घा ताने फक्त तिची स्मृतीच गेली नाही तर ती पॅ रा ला इ ज्ड देखील झाली.

जवळ जवळ २९ दिवस ती को मा मध्ये होती. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे विसरली होती. स्मरणशक्ती गमावलेल्या अनुसाठी हा तिचा पुनर्जन्मच होता. जवळ जवळ ३ वर्षे दीर्घ उपचारानंतर तिची स्मृती परत आली.

अनुने आपली सर्व स्टोरी अनयूजवल: मेमोइर ऑफ ए गर्ल हू कमबॅक फ्रॉम डेड मध्ये सांगितली आहे. आता ग्लॅमरच्या जगतापासून दूर अनु झोपडीमध्ये जाऊन गरीब मुलांना फ्री योगा शिकवते. १९९६ नंतर फिल्मी जगतामधून गायब झालेल्या अनुने योगा आणि अध्यात्मचा मार्ग स्वीकारला आहे.

सोफिया हयात

बिग बॉस सीझन ७ ची कंटेस्टेंट आणि मॉडल सोफिया देखील २०१६ मध्ये शो बीज सोडून नन बनल्यामुळे चर्चेमध्ये आली होती. तिचे म्हणणे होते कि ती रातोरात नन बनली नाही, तर रिलेशनशिपमध्ये अ त्या चा र झाल्याने तिने असे पाऊल उचलले. तथापि लोकांना हे तिचे पब्लिसिटी स्टंट वाटले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने