एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील रेखा त्याच्या आयुष्याबद्दल, त्याच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी प्रकट करतात. जसे की त्याचे जीवन कसे आहे, त्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, त्याच्या जीवनातील आनंद, समृद्धीबद्दल अशा अनेक पुष्कळशा गोष्टी बदल आपल्याला माहित होते. व्यक्तीच्या तळहातावर बऱ्याच प्रकारच्या रेखा असतात.

भविष्यातील रेखा, हृदयरेखा, जीवनरेखा इत्यादी. एखाद्या व्यक्तीच्या तळहाताच्या रेखावरून कोणत्याही मनुष्याचे भविष्य सांगण्यास मदत होते, ज्योतिष शास्त्रांनुसार व्यक्तीच्या तळहातावरील रेखा आणि त्याच्या तळहातावरील निशाणामुळे त्या व्यक्तीच्या भविष्याबद्दलची अनेक रहस्ये उघडकीस येतात, या रेखा कधीकधी शुभतेचे प्रतीक असतात, तर अशा अनेक रेखा व निशाण आहेत ज्यांना अशुभतेचे प्रतीक मानले जाते.

आज आम्ही आपल्याला तळहातावर असलेल्या रेखाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत जर आपल्या पण तळहातावर असे निशाण व रेखा उपस्थित असल्यास, आपण निश्चितच भाग्यवान सिद्ध व्हाल.

मत्स्य निशाण

जर एखाद्याच्या तळहातावरील रेखा एकमेकांना दुभागत असतील आणि माशाचे आकार बनत असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान आहे. या चिन्हास मत्स्य चिन्ह असे म्हंटले जाते ज्या व्यक्तीच्या तळहातावर असे निशाण असेल, त्याला समाजात खूप सन्मान मिळतो आणि तो आयुष्यात खूप संपत्ती मिळवतो. यामुळे त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

त्रिशूळ निशाण

जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर असलेल्या रेखामुळे त्रिशूळचा आकार तयार होत असेल तर ते खूप शुभ मानले जाते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर असे निशाण असते अशा व्यक्तीला जीवनात सर्व सुखसोयी मिळतात, तसेच या व्यक्ती धार्मिक देखील असतात ज्यामुळे त्याचे मनही नेहमी शुद्ध असते.

रथ निशाण

ज्या कोणत्याही व्यक्तीच्या तळहातावर रथाचे निशाण असते ते खूप भाग्यवान असतात कारण असे चिन्ह व निशाण फारच थोड्या लोकांच्या तळहातावर असते. असे निशाण फारच दुर्मिळ मानले जाते. म्हणूनच असे निशाण खूप शुभ सिद्ध होते.

हे निशाण ज्या व्यक्तीच्या तळहातावर असते त्याला राजयोग मिळतो ज्यामुळे त्याच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते आणि त्याचे आयुष्य अगदी आनंदाने व्यतीत होते.

स्वस्तिक निशाण

हिंदू धर्मात स्वस्तिक हे खूप महत्वाचे जाते. ते शुभतेचे प्रतीक आहे, म्हणूनच प्रत्येक पूजा पाठात त्याची पूजा केली जाते आणि जर असे निशाण तुमच्या तळहातावर असेल तर ते तुमचे नशीब चमकावते. कोणत्याही व्यक्तीच्या तळहातावर असे निशाण असेल तर, तो आपल्या आयुष्यात आनंद अनुभवतो. त्याला कधीही अडचणींचा सामना करावा लागत नाही.

ध्वज निशाण

ज्या लोकांच्या तळहातावर ध्वज निशाण आहे ते लढाऊ आणि खूप मेहनती असतात, या लोकांना कधीही हार मानणे आवडत नाही. ते कठोर परिश्रमांच्या जोरावर त्यांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी प्राप्त करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने