बॉलिवूड इंडस्ट्रीचा दबंग अभिनेता सलमान खानला चाहत्यांची कमतरता नाही. होय त्याचे चाहते केवळ देशातच नव्हे तर परदेशातही खूप मोठ्या प्रमाणत आहेत. सलमानचे अजून पर्यंत लग्न झाले नाही पण बऱ्याच मुलींना सलमानसोबत लग्न करायचे आहे. ही गोष्ट केवळ त्याच्या चाहत्यांसाठीच मर्यादित नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा अशा अनेक अभिनेत्री देखील आहेत ज्यांना सलमान खान खूप आवडतो. एवढेच नाही तर त्यांना त्याच्यासोबत लग्नही करायचे आहे.

सलमान खान खूप वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्याने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट केले आहे. अलीकडे बॉलिवूडमध्ये ब-याच अभिनेत्रींनी डेब्यू केला आहे आणि त्यामधील बर्या च अभिनेत्री सलमानवर फिदा आहेत. होय, आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत जी सलमानवर इतकी प्रेम करते की तिला सलमान सोबत लग्न करायचे आहे आणि ती अभिनेत्री दुसरी कोण नसून अनन्या पांडे आहे.

सलमानशी करायचे आहे तिला लग्न

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने इंडस्ट्रीत धूम धडाक्यात एन्ट्री केली. कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्या सोबत ती ''पती पतनी और वो'' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. पण ती सलमान खान सोबतच्या लग्नाच्या वक्तव्यानंतर खूपच चर्चेत आली. एकदा अनन्या सलमान खानचा शो बिग बॉसमध्ये आली होती.

त्या शोमध्ये सलमानने अनन्या बरोबर खूपच मजा मस्ती केली होती. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अनन्याला सलमानबद्दल खूप प्रश्न विचारले होते. अनन्याला विचारले गेले होते की तिला आपला नवरा कोणाला बनवायची इच्छा आहे त्यावर अनन्याने सलमान खान म्हणून दिलखुलास उत्तर दिले होते.

''पती पतनी और वो'' या चित्रपटाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. पण अनन्याचा डेब्यू चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनन्या सोशल मीडियावर खूप अॅाक्टिव्ह होती. ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे जास्तच चर्चेत होती. अनन्या पांडेची गणना बॉलिवूडच्या सर्वात स्टाईलिश आणि लोकप्रिय स्टार मुलींमध्ये केली जाते. ती शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि संजय कपूरची मुलगी सुहाना कपूरची बेस्ट फ्रेंड आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने