११ ऑक्टोंबर रविवारी पुष्य नक्षत्राचा संयोग बनत आहे. ज्योतिषमध्ये याला रवि पुष्य योग म्हंटले जाते. या योगामध्ये खरेदी आणि इतर शुभ कामे केल्याने त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. काशीच्या ज्योतिषाचार्यांनुसार हा वर्षातील पहिला आणि शेवटचा असा रवि पुष्य संयोग आहे जो पूर्ण दिवस राहणार आहे. याआधी १२ जानेवारीला जवळ जवळ ४ तासासाठी हा योग बनला होता नंतर १३ सप्टेंबर च्या रात्री हा योग बनला होता.

हि स्थिती वर्षातून तीन ते चार वेळाच बनते. यामुळे प्रत्येक प्रकारची शुभ कामे आणि नवीन कामाच्या सुरुवातीसाठी ११ तारखेला बनत असलेला शुभ संयोग खूपच खास राहील. या शुभ संयोगामध्ये केल्या गेलेल्या देवाण-घेवाण, गुंतवणूक, खरेदी आणि सुरु केलेल्या कामांपासून धन लाभ होतो.

प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक आणि खरेदीसाठी शुभ दिवस

ज्योतिषाचार्यांनुसार या योगामध्ये खरेदी खूपच फायदेशीर असते. रविवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे रविपुष्य योग बनत आहे. या दिवशी पुष्य नक्षत्र सकाळी ६.२० पासून सुरु होईल आणि रात्री १.२० पर्यंत राहील. या दिवशी हिऱ्याची आभूषणे, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाइल, जमीन, घर, कपडे आणि इतर खरेदी केल्याने सुख-समृद्धी वाढते.

याशिवाय जमीन, घरामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर हा दिवस फायेशीर सिद्ध होऊ शकतो. तर वाहन, फर्नीचर, ज्वेलरी, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर घरगुती सामान खरेदी देखील शुभ राहील.

२७ नक्षत्रांमध्ये ८ वा आहे पुष्य

ज्योतिषशास्त्रात उल्लेख केलेल्या २७ नक्षत्रांमध्ये ८ व्या नंबरवर पुष्य नक्षत्र असतो. हे नक्षत्र गुरुवार आणि रविवारचा दिवस असल्यास महायोग बनतो. यासोबत सोमवारी आणि शुक्रवारी हा नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. यामुळे सर्व नक्षत्रांमध्ये पुष्यला सर्वात श्रेष्ठ मानले आहे. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे. रवि पुष्य योगामध्ये मांगलिक काम आणि खरेदी केली जाऊ शकते.

पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करणे आहे अत्यंत शुभ

सोने-चांदी, वाहन आणि प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी रवि पुष्य नक्षत्रला पवित्र मानले गेले आहे. बारा राशींमध्ये एकमात्र कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि पुष्य नक्षत्राच्या सर्व चरणांदरम्यानच चंद्र कर्क राशीमध्ये राहतो. यामुळे पुष्य नक्षत्रला धनासाठी अत्यंत पवित्र मानले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने