मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी सरकारची सुकन्या समृद्धि योजना खूपच महत्वाची आहे. आपण सुकन्या समृद्धि योजनेत गुंतवणूक करून आपल्या मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नाचा खर्च सहजपणे पूर्ण करू शकता. जर आपण आपल्या मुलीच्या कमी वयातच या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर आपण या योजनेमध्ये १५ वर्षे गुंतवणूक करू शकता. चला तर जाणून घेऊया आपल्या मुलीसाठी ६४ लाख रुपये कसे जमा करू शकता.

सुकन्या समृद्धि अकाउंट योजना २०२० डिपॉजिट: एका आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही एका खात्यात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता. त्याचबरोबर आर्थिक वर्षात किमान ठेव रक्कम २५० रुपये इतकी आहे. याचा अर्थ असा की आपण एका आर्थिक वर्षामध्ये खात्यात दीड लाख रुपयांपर्यंत आणि एका खात्यात किमान 250 रुपये गुंतवणूक करू शकता.

जर एखाद्या व्यक्तीने चुकून या खात्यात दीड लाखाहून अधिक रुपये जमा केले तर ही रक्कम व्याजासाठी मोजली जाणार नाही. तसेच ही रक्कम ठेवीदारांच्या खात्यावर परत केली जाईल. या खात्यामध्ये १५ वर्षांपर्यंत पैसे जमा केले जाऊ शकतात.

किती व्याज मिळणार आहे

सुकन्या समृद्धि योजनेत सध्या ७.६ टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत खाते उघडताना जो व्याज दर राहील, त्याच दराने संपूर्ण गुंतवणूकीच्या कालावधीत व्याज दिले जाते. पोस्ट ऑफिस सेव्हींग अकाऊंट यासह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर सरकारने जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत व्याज दरात बदल केलेला नाही.

तुम्हाला मॅच्युरिटी वर ६४ लाख रुपये मिळतील

सध्याच्या व्याज दरानुसार प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा केले तर तुमच्याद्वारे जमा केलेली एकूण रक्कम २२,५०,००० रुपये इतकी असेल आणि त्यावर ४१,३६,५४३ रुपये इतके व्याज होईल. तथापि २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्युरिटी होईल.

अशामध्ये खात्यावर जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. २१ वर्षांपर्यंत ही रक्कम व्याजासह जवळ जवळ ६४ लाख रुपयांपर्यंत होईल. आपणास हे लक्षात ठेवले पाहिजे की केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत सुकन्या समृद्धि योजनेवर मिळणारे व्याज निश्चित करते. अशामध्ये व्याज दरामध्ये अनेक वेळा बदल देखील होऊ शकतो.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

सुकन्या समृद्धि अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी. ठेवीदाराचे पत्त्याचे प्रमाणपत्र म्हणजेच पालक याचे पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोल बिल, इत्यादी. आपण पैसे जमा करण्यासाठी तुम्ही नेट-बँकिंगची सुविधा देखील वापरू शकता. खाते उघडल्यानंतर आपण ज्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकमध्ये खाते उघडले आहे तेथून तुम्हाला पासबुक मिळेल.

कोण उघडू शकते खाते

आपण मुलीचे नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक असल्यासच आपण हे खाते उघडू शकता. आपण मुलीच्या नावावर असे एकच खाते उघडू शकता. एकंदरीत आपण दोन मुलींच्या नावे देखील हे खाते उघडू शकता. परंतु दुसर्याा मुलीच्या जन्माच्या वेळी तुम्हाला जुळी मुलगी असल्यास आपण तिसरे खातेदेखील उघडू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने