आपल्या देशामध्ये एक अशी भाजी विकली जाते ज्याची किंमत १२०० रुपये प्रती किलो आहे. किंमत जाणून आपल्याला अंदाज लागला असेल कि हि देशातील सर्वात महागडी भाजी आहे. या भाजीचे नाव खुखडी आहे आणि या भाजीची पैदास फक्त झारखंड आणि छत्तीसगडमध्ये केली जाते आणि विकली जाते. १२०० रुपये प्रती किलोची हि भाजी क्षणात विकली जाते.

छत्तीसगडमध्ये या भाजीला खुखडी म्हंटले जाते तर झारखंडमध्ये रुगडा म्हंटले जाते. हि खुखडी मशरूमसारखी प्रजाती आहे. हि प्राकृतिक रूपाने जंगलामध्ये उगते. असे म्हंटले जाते कि तोडल्यानंतर २ दिवसांच्या आत याचे सेवन करावे लागते, अन्यथा ती खराब होऊन जाते. हि प्रोटीनने भरपूर असते.

हि भाजी फक्त पावसाच्या ऋतूमध्ये पाहायला मिळते. फक्त दोन महिने उगणाऱ्या या भाजीची मागणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. गावातील लोक याला जमा करतात आणि व्यापारी याला कमी दरामध्ये खरेदी करून मोठ्या दरामध्ये विकतात. व्यापारी शहरामध्ये याला १००० रुपये ते १२०० रुपये प्रती किलो दराने विकतात.

माहितीनुसार छत्तीसगडच्या अंबिकापुर बाजारामध्ये दररोज ५ क्विंटलची मागणी होते. खुखडी एक प्रकारचा खाल्ला जाणारा मशरूम आहे. तसे तर खुखडीच्या अनेक जाती आहेत पण बराच काळ थंड राहणारी खुखडी जास्त पसंत केली जाते. यामुळे इम्युनिटीची वाढ होण्यास मदत होते.

माहितीनुसार श्रावणाच्या महिन्यामध्ये मांसाहाराचे सेवन केले जात नाही. अशामध्ये दूरवरच्या भागामध्ये उगवणारी हि खुखडी नॉन वेज म्हणून पाहिली जाते. खुखडीचा वापर औषधे बनवण्यासाठी देखील केला जातो. येथील लोकांचे मानणे आहे कि पावसादरम्यान जेव्हा जमीन फाटते तेवेहा त्यामधून खुखडी उगवते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने