आपल्या शास्त्र आणि पुराणामध्ये मनुष्याच्या सुखी आणि आनंदी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. अशा काही नियमांबद्दल सांगितले गेले आहे, ज्यांचे पालन केल्यास मनुष्याचे आयुष्य आनंद आणि समृद्धीने भरून जाते. या नियमांचे पालन केल्यास व्यक्तीच्या आयुष्यामधील समस्या संपुष्टात येऊ लागतात, सर्वात मोठी गोष्ट हि आहे कि ईश्वराचे सामिप्य प्राप्त होते. आज आम्ही एक श्लोक अवगत करणार आहोत ज्यामधील काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अमलात आणू शकता. चला तर जाणून घेऊया त्या श्लोकामध्ये अशा कोणत्या ५ गोष्टी आहेत.

श्लोक:- “विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:। असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।।“ श्लोकमध्ये सांगितले गेले आहे कि मनुष्याचे आयुष्य सुधारण्यासाठी श्रीहरीची पूजा आणि एकादशीचे व्रत करावे. एकादशीच्या व्रताला व्रतराजची संज्ञा दिली गेली आहे. श्रीहरीचे हे व्रत कष्टामधून मुक्ति देते आणि यामुळे काम, अर्थ आणि मोक्षची प्राप्ती होते.

मनुष्याला श्रीमद भागवत गीतेचे पठन करायला हवे. नियमित गीतेचे पठन केल्याने व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची समस्या उद्भवत नाही. आयुष्यामधील सर्व समस्यांमधून मुक्त होण्याचा मार्ग गीतेमध्ये सांगितला गेला आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा प्रत्येक उपदेश कष्टांमधून मुक्ति प्रदान करतो. त्याचबरोबर यामुळे भगवान श्रीकृष्णाची कृपादेखील प्राप्त होते.

हिंदू धर्मामध्ये तुळशीला पूज्य मानले गेले आहे. तुळशीला माता आणि देवीचा दर्जा दिला गेला आहे. त्याचबरोबर श्रीकृष्णाला तुळस खूप प्रिय आहे. भगवान विष्णूने तुळशीला आपल्या डोक्यावर स्थान दिले आहे. त्याचबरोबर विष्णूजीच्या पूजेमध्ये तुळशी आवश्यक मानले गेले आहे. यामुळे तुम्ही घरामध्ये तुळशीचे रोप स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करावी. यामुळे तुमच्यावर सर्व देवी देवतांची कृपा बनून राहील.

श्लोकानुसार निर्धन आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. त्यांच्यासोबत कधीची दुर्व्यवहार करू नये. यांच्यासोबत दुर्व्यवहार आणि यांचा अपमान करणारा व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही. म्हणून गरजू लोकांची शक्य तेवढी मदत करावी आणि त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर वेळोवेळी दान करत राहावे.

आपल्या शास्त्रामध्ये गायीला मातेचे स्थान प्राप्त आहे. गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवता असल्याचे सांगितले गेले आहे. भगवान श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे. गायीची सेवा केल्याने पुण्य आणि मोक्ष प्राप्ती होते. यामुळे तुम्ही गुरुवारी किंवा शक्य असल्यास गायीला दररोज हिरवा चारा द्यावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने