बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्र*ग्स प्रकरणामध्ये १४ दिवसांसाठी जे*लमध्ये पाठवण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूत डे*थ केसमध्ये देखील रिया सामील असल्याचा अंदाज लावला जात आहे. तसे रियाचे फिल्मी करियर काही खास राहिले नाही. तिचे सर्व चित्रपट तिची ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरले. अशामध्ये इतक्या मोठ्या कंट्रोवर्सीमध्ये अडकणे तिला कोणत्या वळणावर घेऊन जाईल हे येणारा काळच ठरवेल. तसे याआधी देखील अनेक कलाकारांनी जेलची हवा खाल्ली आहे. यानंतर अनेकजण करियरमध्ये सफल झाले तर काही अज्ञात देखील झाले. आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

सलमान खान

बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा वादांशी खोल संबंध आहे. त्याच्यावर अनेक प्रकरणे नोंद आहेत. काळ्या ह-री-णाची ह-त्या आणि हि-ट अँड र-न प्रकरणामध्ये त्याने जे-लची हवा देखील खाल्ली आहे. पण याचा त्याच्या करियरवर कोणताही परिणाम झाला नाही. आजदेखील तो बॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

शाइनी आहूजा

बॉलीवूड अभिनेता शाइनी आहूजाच्या करियरची सुरुवात खूपच चांगली झाली होती. त्याला डेब्यू चित्रपटासाठी फिल्मफेयर अॅवॉर्ड देखील मिळाला. त्याचे करियर चांगले चालू होते पण २००९ मध्ये त्याच्या हाऊस मेडने त्याच्यावर दु-ष्कर्मचे आरोप लावले. नंतर त्यामध्ये तो दो-षी आढळला आणि त्याचे पूर्ण करियर संपुष्टात आले. त्याला ७ वर्षांची जे-ल देखील झाली होती.

संजय दत्त

संजय दत्तचे अनेक वर्षांपासून बॉलीवूडमध्ये वर्चस्व आहे. त्याला बे-का-यदेशीर ह-त्या-रे बा-ळगल्याप्रकरणी ५ वर्षांची सजा झाली होती. पण याचा त्याच्या करियर काही खास परिणाम झाला नाही. जे-ल मधून बाहेर आल्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट दिले.

फरदीन खान

बॉलीवूड अभिनेता फरदीन खान, फिरोज खानचा मुलगा आहे. तसे त्याचे करियर खास राहिले नाही. पण २००१ मध्ये तो ड्र-ग्स ख-रेदी प्रकरणामध्ये पकडला गेला होता. ज्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली आणि त्याला जे-लची हवा खावी लागली. जे-लमधून आल्यानंतर त्याचे करियर पूर्णपणे संपुष्टात आले.

मधुबाला

बॉलीवूडची ब्युटी क्वीन मधुबालाने देखील जे-लची हवा खाल्ली आहे. वास्तविक डायरेक्टर बी आर चोपडाने तिला नया दौर चित्रपटासाठी साईन केले होते आणि फीस देखील अॅडवांस दिली होती. नंतर मधुबालाने चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. त्यामुळे बी आर चोपडा मधुबाला विरुद्ध कोर्टामध्ये पोहोचले. तथापि नंतर बी आर चोपडाने केस मागे घेतली होती. पण या घटनेचा मधुबालाच्या करियरवर काही खास परिणाम झाला नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने