श्राद्धाचा महिना सुरु झाला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पितरांच्या आठवणीमध्ये त्यांच्यासाठी दान केले जाईल. हा काळ असा काळ आहे ज्यामध्ये आपण पूर्वजांची आठवण करून त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी वर्षाच्या या काही दिवसांमध्ये विशेष पूजेचे आयोजन करत असतो. अशी मान्यता आहे कि जे परिजन आपला देह त्याग करून निघून जातात, त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी या काळामध्ये दान केले जाते. विशेष म्हणजे हे श्रद्धेने केले पाहिजे. हि देखील मान्यता आहे कि मृत्यूची देवता यमराज श्राद्ध पक्षामध्ये जीवांना मुक्त करते, जेणेकरून ते त्यांच्या परीजानांच्या जवळ जाऊन तर्पण ग्रहण करू शकतील.

कोणाला म्हंटले जाते पितर?

कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, मग तो लहान असो किंवा मोठा, विवाहित असो किंवा अविवाहित, बाळ असो किंवा कोणत्याही वयामध्ये मृत्यूला प्राप्त झालेला असो, त्यांना पितर म्हंटले जाते. शास्त्रानुसार पितरांना प्रसन्न केल्याने घरामध्ये सुख शांती येते. पितृपक्षामध्ये सर्व लोकांनी पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण केले पाहिजे, जर तुम्हाला त्यांची मृत्यू तिथी माहिती नसेल तर अश्विन अमावस्येला तर्पण करू शकता, या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हंटले जाते.

श्राद्धा संबंधी पौराणिक कथा

श्राद्ध पक्षामध्ये अशी काय मान्यता आहे, हे कसे सुरु झाले, पितरांना संतुष्ट करणे का जरुरी मानले गेले आहे. वास्तविक यामागे महाभारत काळापासून एक मान्यता आहे. ज्यानुसार महाभारतच्या युद्धामध्ये दानवीर कर्णचे निधन झाले आणि त्याचा आत्मा स्वर्गामध्ये पोहोचला. तेव्हा त्याला नियमित भोजनाऐवजी सोने आणि दागिने देण्यात आले.

यावर निराश होऊन कर्णाच्या आत्माने इंद्रदेवाला याचे कारण विचारले. तेव्हा इंद्राने कर्णाला सांगितले तू तुझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये सोन्याचे आभूषणे दान केलीस पण कधी पूर्वजांना भोजन दान केले नाही. तेव्हा कर्णाने उत्तर दिले कि त्याला आपल्या पूर्वजांविषयी माहित नाही आणि हे ऐकल्यानंतर इंद्र देवाने त्याला १५ दिवसांच्या अवधीसाठी पृथ्वीवर परत जाण्याची अनुमती दिली जेणेकरून तो आपल्या पूर्वजांना भोजन दान करू शकेल. याच १५ दिवसांच्या अवधीला पितृपक्ष म्हणून ओळखले जाते.

या चुका करू नये

पितृ पक्षामध्ये तर्पण आणि श्राद्धाचे कार्य विधिवत करावे. पितृपक्षा दरम्यान दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अनादर करू नये. व्यक्तीच नाही तर इतर कोणत्याही प्राण्याला उपाशी पाठवू नये. अशी मान्यता आहे कि पूर्वज कोणत्याही रुपामध्ये आपल्या समोर येऊ शकतात. पितृपक्षामध्ये कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू नये. पितरांना लोखंडी भांड्यामध्ये जल देऊ नये, असे केल्याने आपले पितर नाराज होतील. पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये जल द्यावे. पितृपक्षादरम्यान मांस आणि म-द्यपान करणे वर्जित आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने