ना र को टि क्स कंट्रोल ब्यूरोच्या चौकशीत अभिनेत्री श्रद्धा कपूरने एक मोठा खुलासा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धा म्हणाली की सुशांतसिंग राजपूत हा ड्र ग्ज घेत असे. श्रद्धा म्हणाली की सुशांत चित्रपटाच्या सेट्स वर आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्र ग्स घेत असे. मात्र श्रद्धाने स्वतःहून ड्र ग्स घेण्यास नकार दिला होता. ती म्हणाली की सुशांतसिंग राजपूतने होस्ट केलेल्या ड्र ग्स पार्टीमध्ये नक्कीच गेली होती पण ड्र ग्ज कधीही घेतले नाहीत. छिछोरे चित्रपटाच्या रिलीजनंतर या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

एन सी बीने श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोण यांना चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु तिन्ही अभिनेत्रींनी स्वत: ड्र ग्स घेण्यास नकार दिला आहे. चौकशीदरम्यान दीपिका खूप चिंताग्रस्त दिसत होती. सारा अली खानही थोडी चिंताग्रस्त दिसत होती. सूत्रांच्या माहितीनुसार सारा म्हणाली की सुशांत केदारनाथ चित्रपटाच्या सेटवर ड्र ग्ज घेत होता.

सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका पादुकोणने ड्र ग्स चॅट केले आहे असे मान्य केले आहे. सुरुवातीला दीपिकाने यास नकार दिला होता पण एन सी बीने तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला समोर बसवले आणि बऱ्याच चौकशीनंतर तिने कबूल केले कि तिने चॅटमध्ये मा ल मागवला होता.

दीपिकाला सकाळी दहा वाजताची वेळ देण्यात आली होती. तर श्रद्धाला दहा ते साडे दहा दरम्यानची वेळ देण्यात आली होती. पण श्रद्धाने एक तास एक्सट्रा मागितला होता. श्रद्धा बारा वाजता एन सी बी कार्यालयात पोहोचली होती. तिच्या सोबत तिचा एक अंगरक्षकदेखील होता. तर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास सारा अली खान एनसीबी कार्यालयात पोहोचली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने