येत्या २९ सप्टेंबरला न्यायाचा ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनि आता सरळ चाल करत आहेत. १४२ दिवसानंतर म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता शनि वक्री मार्गातून सरळ चाल करत आहे. ज्या राशीवर शनीचा प्रभाव होता तो शनिच्या मार्गामुळे बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. शनिचा ११ मे २०२० पासून वक्री मार्ग होते एक खूप मोठी घटना होती.

यापूर्वी २४ जानेवारी रोजी शनि धनु पासून मकर राशीमध्ये आला होता. शनिच्या मार्गी होण्याने मिथुन, कन्या, कर्क, धनु आणि वृश्चिक राशींच्या लोकांना खूप फा-यदा होईल. अडीच वर्षानंतर शनि एका राशीतून दुसर्याय राशीमध्ये जात असतो. यामुळे शनिची साडेसाती ध्यास सुरू होते.

शनिच्या या परिवर्तनामुळे कुंभ राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचे पहिले चरण सुरू झाले आहे. तर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आधीपासूनच धनु व मकर राशीवर चालू आहे. तो देखील या वर्षाच्या अखेरीस संपेल. शनिच्या वक्री मार्गामुळे ज्या लोकांवर साडेसाती होती त्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. आता शनि या लोकांना त्रासातून मुक्त करणार आहे. मेष राशीच्या लोकांना कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

धनु राशींचा लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आत्ताच दिसून येईल. पण या वर्षाच्या अखेरीस हा प्रभाव देखील कमी होईल. मकर आणि कुंभ राशींच्या लोकांवर देखील शनिच्या साडेसातीचा प्रभाव दिसून येईल. कुंडली पाहूनच व्यक्तिगतरीत्या जातकांबद्दल शनि अशुभ आणि शुभ परिणामांबद्दल सांगितले जाऊ शकते.

तसेच मिथुन राशिच्या लोकांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराच्या साथीमुळे आपल्याला फा-यदा होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट होईल व जुन्या आठवणीना उजाळा मिळेल. आरोग्यासाठी वेळ चांगला असेल.

टीप : आपल्या कुंडली आणि राशी ग्रहांच्या आधारावर आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना आणि वरती उल्लेख केलेल्या घटनांपेक्षा वेगळ्या होऊ शकतात. अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या ज्योतिष तज्ञाचा सल्ला घेऊ शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने