अंकुर चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री शबाना आजमी आज ७० वर्षांची झाली आहे. तिचा जन्म १८ सप्टेंबर १९५० रोजी हैद्राबादमध्ये झाला होता. शबानाची फिल्मी करियरमधील सर्वात मोठी हि ओळख आहे कि पाच वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि चारवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये शबाना आजमी खूपच लोकप्रिय झाली होती. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने साइकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केले होते. चित्रपटांसोबत अनिल कपूरच्या २४ या डिटेक्टिव्ह टीव्ही शोमध्ये देखील तिने काम केले. सध्या ती आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत टाईम स्पेंड करत आहे.

शबाना जितकी अभिनय आणि चित्रपटांसाठी ओळखली जात होती तितकीच ती आपल्या पर्सनल लाईफबद्दल देखील नेहमी चर्चेमध्ये राहत होती. तिने विवाहित आणि दोन मुलांचे वडील जावेद अख्तरसोबत लग्न केले आहे. शबानाचे कुटुंबीय या लग्नाच्या विरुद्ध होते. पण तिने आपल्या कुटुंबियांच्या विरुद्ध जाणून जावेदची दुसरी पत्नी बनण्याचा निर्णय घेतला.

जावेद अख्तर ७० च्या दशकामध्ये शबाना आजमीचे वडील कैफी आजमीकडून लिहिण्याची कला शिकून घेत होते. त्यांना आपल्या लिहिलेल्या कविता दाखवत होते आणि सल्ला देखील घेत होते. यादरम्यान जावेद आणि शबानामध्ये जवळीक वाढू लागली.

यादरम्यान शबानामुळे जावेद आणि हनीच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. दोघांमध्ये नेहमी भांडणे होऊ लागली. दररोजच्या भांडणांमुळे हनीने जावेदला शबानाकडे जाण्याची परवानगी देऊन टाकली. तिने जावेदला म्हंटले कि त्याने शबानाकडे जावे आणि मुलांची चिंता करू नये. तेव्हा दोघांनी परस्पर संमतीने एकमेकांना घटस्फोट दिला.

शबानाचे वडील कैफी आजमी या नात्यावर खुश नव्हते. त्यांना वाटत होते कि शबानामुळे जावेद आणि हनीमध्ये वाद झाला. त्यांची इच्छा नव्हती कि शबानाने अशा व्यक्तीसोबत लग्न करावे जो आधीपासूनच विवाहित आहे. नंतर शबानाने वडिलांना समजावले कि जावेदचे लग्न तिच्यामुळे मोडले नाही. तेव्हा त्यांनी या दोघांना लग्नासाठी मंजुरी दिली.

शबानाने एका मुलाखतीमध्ये हि गोष्ट कबूल केली होती कि बँडिट क्वीन सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर कपूरशी ती अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यांचा ब्रेकअप देखील परस्पर संमतीने झाला होता. शबानाने हे देखील म्हंटले होते कि जेव्हा त्यांचा ब्रेकअप झाला तेव्हा तिने शेखरसोबत एक चित्रपट केला होता. याचे दिग्दर्शक शेखर होते आणि त्यांची पत्नी मेधा त्यांना असिस्ट करत होती.

२००४ मध्ये एका मुलाखती दरम्यान शबानाने हे कबूल केले होते कि त्यांना शशी कपूरवर क्रश होते. तिने सांगितले कि, शशी आणि त्यांची पत्नी जेनिफर आमचे फॅमिली फ्रेंड होते. पृथ्वीराज कपूर माझ्या पॅरेंट्सच्या शेजारी राहत होते आणि प्रत्येक रविवारी जेव्हा शशी वडिलांना भेटायला येत होते तेव्हा त्यांच्या साईनसाठी एक फोटो खरेदी करत होते. जेव्हा मी फकीरसाठी त्यांच्यासोबत सिलेक्ट झाले तेव्हा खूप घाबरले होते. ते खूप मोठे हिरो होते.

शबानाने शतरंज के खिलाड़ी, अमर अकबर एंथोनी, चोर सिपाही, एक ही रास्ता, परवरिश, स्वामी, देवता, स्वर्ग नर्क, अमरदीप, हम पांच, ज्वालामुखी, एक ही भूल, सिवर्ग, रास्ते प्यार के, अवतार, लहू के दो रंग, मंडी, मासूम, जज्बा, नीरजा सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने