वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे नैसर्गिक आहे. पण कमी वयामध्येच केस पांढरे होण्याने व्यक्तित्वचे आकर्षण संपुष्टात येते. केसांच्या मुळांमध्ये असलेल्या सेबेक्वस ग्रंथिमधून सेबम नावाचे तैलीय तत्व निघते. ज्यामुळे केसांचा रंग निश्चित होतो. हे तत्व केसांना पोषण देखील देते. सेबेक्वस ग्रंथिची सक्रियता कमी होण्याने केस पांढरे होऊ लागतात. अधिकतर पुरुषांचे केस ३५ ते ४० च्या वयामध्ये कानांच्या जवळचे केस पांढरे होऊ लागतात आणि ५० च्या वयामध्ये बहुतेक केस पांढरे होतात. यामुळे वयाच्या चाळीशीनंतर केस पांढरे होणे स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण कमी वयामध्ये केस पांढरे होणे एक आजार आहे आणि आजच्या काळामध्ये बहुतेक लोक या आजाराने त्रस्त आहेत.

असे म्हंटले जाते कि आपल्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचे काम केस करत असतात. यामुळे प्रत्येकाची इच्छा असते कि आपले केस सुंदर दिसावेत आणि दाट असावेत. पण फॅशनच्या काळामध्ये आजकाल बाजारामध्ये मिळणारे केमिकलचे आणि शॅम्पू आणि तेल वापरले जातात ज्यामुळे केस खूपच लवकर पांढरे होतात आणि गळू लागतात. जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे केस पांढरे होतात तेव्हा लोक सर्वात पहिला मेहेंदी लावणे पसंत करतात. पण हे एक किंवा दोन महिन्यांपेक्षा जास्त टिकत नाही आणि केस पुन्हा पांढरे होऊ लागतात. यामुळे आज आम्ही एक असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे केस नेहमी काळे दिसतील.

हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला आवळा पावडर घ्यावी लागेल जी बाजारामध्ये सहजरीत्या मिळते आणि नंतर हि पावडर अर्ध्या लिटर पाण्यामध्ये घेऊन हे मिश्रण चांगले मिक्स करावे आणि याची पेस्ट तयार करावी. पण लक्षात ठेवा कि हि पेस्ट लगेच लावू नये तर हि पावडर रात्रभर पाण्यामध्ये मिसळून ठेवा आणि नंतर सकाळी उठून याला गॅसवर थोडे गरम करून घ्यावे. ज्यानंतर हि पेस्ट आधीपेक्षा थोडी गाढी होईल. यामध्ये एक चमचा रिठा पावडर मिसळा आता हि पेस्ट चांगली मिसळा आणि याला थोडे थंड होऊ द्या.

जेव्हा हि पेस्ट थोडी थंड होईल तेव्हा यामध्ये एका लिंबाचा रस मिसळा आणि नंतर हे मिश्रण एकत्र करून आपल्या केसांना लावा. लक्षात ठेवा कि हि पेस्ट तुमच्या केसांच्या मुळापासून ते पूर्ण केसाला लागली पाहिजे. जेव्हा पूर्णपणे हि पेस्ट तुमच्या केसांना लावून होईल तेव्हा काही तास याला सुखु द्यावे आणि नंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या.

हा उपाय आठवड्यामधून कमी कमी २ वेळा जरूर करा. हळू हळू तुमचे केस काळे होऊ लागतील आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना नैसर्गिक चमक येईल आणि केस मजबूत होतील. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि हे पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे तुमच्या केसांना नुकसान देखील होणार नाही आणि तुमचे डोके देखील थंड राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने