कपलमध्ये भांडणतंटे असणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. कपलमध्ये कधी प्रेम तर कधी भांडणे ही चालूच असतात परंतु अशा परिस्थितीत कधीही आपल्या मर्यादा ओलांडू नये. कारण कधीकधी चेष्टेमध्ये परिस्थिती इतकी बिघडते की काहींचे त्यांच्या रागावर नियंत्रण राहत नाही. अशा परिस्थितीत, बरेच लोक अशा गोष्टी बोलतात, ज्यामुळे जोडीदाराच्या मनाला खूप लागते. ज्यामुळे आपले सं-बंध जास्तच बिघडू शकतात. दरम्यान, आज आम्ही सांगणार आहोत की रागाच्या भरात आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी कधीही बोलू नयेत.

सेल्फिश

जेव्हा जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या नात्यात काहीतरी अनबन आहे. अशा परिस्थितीत आपल्या जोडीदारास वेळ द्या आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. बर्याआच वेळा एखादी व्यक्ती कामात इतकी व्यस्त होते की आपल्या जोडीदारासाठी वेळ काढू शकत नाही. अशावेळी आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. तर या गोष्टीवर बरेच जण एकमेकांना रागाच्या भारत सेल्फिश देखील बोलतात, ज्यामुळे जोडीदाराचे मन दुखावू शकते.

सासरच्यांना अपशब्द बोलू नका

सासरच्यांना अपमानास्पद शब्द कधी बोलू नका. मॅरिड कपल्समध्ये लग्नानंतर भांडणे इतकी वाढतात की बर्यांचदा दोघेही त्यांची मर्यादा विसरतात. अशा परिस्थितीत रागाच्या भरात असे काहीतरी बोलतात जे त्यांनी बोलायला नको असते. इतकेच नाही तर भांडणामध्ये एकमेकांच्या आई-वडिलांना अपशब्द बोलू लागतात. जे कदाचित कोणी सहन करू शकेल. अशा परिस्थितीत नात्यात मोठा पेच निर्माण होऊ शकतो.

तुझ्यावर प्रेम करणे ही आयुष्यातील माझी एक मोठी चूक होती

नेहमी असे पाहायला मिळते कि भांडणादरम्यान पार्टनर एकमेकांना असे म्हणतात की तुझ्यासोबत लग्न करणे किंवा तुझ्यावर प्रेम करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. या प्रकारच्या गोष्टी जोडीदाराच्या मनाला खूप वाईट वाटतात. ज्याला एक व्यक्ती कधीही विसरू शकत नाही. म्हणून जर आपणास आपले सं-बंध वाईट करायचे नसतील तर रागाच्या भरात अशा गोष्टी कधीही बोलू नका.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने