गेल्या काही वर्षांमध्ये अक्षय कुमारने आपली ओळख एका अभिनेत्यापेक्षा एक खरा भारतीय म्हणून बनवली आहे. एक असा भारतीय नागरिक जो कठीण काळामध्ये देशासाठी पुढे येतो, जो दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतो. यामध्ये काहीच शंका नाही कि अक्षय एक उत्कृष्ठ अभिनेता आहे, लोक त्याला खूप पसंत करतात आणि हेच कारण आहे कि त्याला आपल्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा मिळाल्या आहेत. आउटसाइडर असून देखील आज अक्षयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही रंजक माहिती.

५३ वर्षांचा झाला खिलाडी

बॉलीवूडमध्ये खिलाडी म्हणून नावाने प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार ५३ वर्षांचा झाला आहे. नुकताच त्याचा वाढदिवस होऊन गेला. ९ सप्टेंबर १९६७ रोजी जन्मलेल्या अक्षयचे खरे नाव राजीव भाटीया असे आहे. अमृतसरमध्ये जन्मलेल्या अक्षय कुमारचे आयुष्य चित्रपटाच्या झगमगाटापासून दूर होते. तो एक शेफ आणि वेटरचे काम करत होता. नंतर एक दिवस चित्रपटांमध्ये हिरो बनण्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि तो मुंबईला आला. संघर्षाच्या काळामध्ये तो खचला नाही आणि आपल्या उत्कृष्ठ कामाच्या बळावर तो आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. मुंबईच्या प्राइम बीचवर त्याचे स्वतःचे घर आहे.

हाईएस्ट पेड भारतीय अभिनेता

अक्षय कुमारचे नाव याच वर्षी फोर्ब्सच्या हाईएस्टळ पेड अभिनेत्यांच्या यादीमध्ये सामील केले गेले आहे. लिस्टमध्ये अक्षय कुमार एकमात्र असा अभिनेता आहे ज्याचे नाव या लिस्टमध्ये आहे. अक्षय कुमार एका चित्रपटासाठी ४५ करोड रुपये पेक्षा जास्त फीस घेतो. तर ब्रँड जाहिरातीसाठी तो जवळ जवळ ६ ते ७ करोड रुपये चार्ज करतो. अक्षय कुमारचा त्याच्या चित्रपटाच्या कमाईमध्ये देखील शेयर असतो. अक्षय बॉलीवूडचा एकमात्र असा स्टार आहे जो एका वर्षामध्ये जवळ जवळ ४ ते ५ चित्रपट पूर्ण करतो.

२०२० मध्ये केली आहे इतकी कमाई

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि २०२० मध्ये म्हणजे यावर्षी कोणत्याही चित्रपटाच्या रिलीजशिवाय अक्षय कुमारने ४८.५ मिलियन डॉलर म्हणजे एकूण ३६३ करोड इतकी कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो १८७० करोड रुपये संपत्तीचा मालक आहे. त्याचे बहूतांश उत्पन्न ब्रँड प्रमोशनमधूनच होते. अक्षय कुमारजवळ लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे, ज्यामध्ये मर्सिडीज-बेंज, बेंटले, होंडा सीआरवी पासून पोर्श पर्यंत कार्सचा समावेश आहे. अक्षयला महागड्या बाईक्सची देखील खूप आवड आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने