आयुर्वेदिक गुणधर्म असणार्याू पिंपळाला आपल्या देशामध्ये पूजले जाते. कदाचित याचे कारण हे आहे कि पिंपळ आपल्याला २४ तास ऑक्सींजन देतो आणि प्रकृतीमध्ये ऑक्सिजनचे संतुलन राखण्यास मदत करतो. पिंपळाच्या पानांचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. कशाप्रकारे पिंपळाची पाने अनेक आजार दूर करतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुढे जाणून घेऊया त्या ५ आजारांबद्दल ज्यांच्या इलाजामध्ये याचा वापर केला जातो. याशिवाय हृदयाच्या अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचण्यासाठी देखील पिंपळाची पाने फायेदेशीर सिद्ध होतात.

हृदयरोग

आयुर्वेदामध्ये पिंपळाच्या पानांचा वापर हार्टसंबधित आजारांना ठीक करण्यासाठी केला जातो. यासाठी जो उपाय सांगितला गेला आहे तो अशाप्रकारे आहे. पिंपळाची ताजी १५ हिरवी पाने घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये चांगल्याप्रकारे उकळून घ्या. हे पाणी तेव्हापर्यंत उकळावे जेव्हा पर्यंत ते आटून एक तृतियांश होत नाही. नंतर याला थंड करून या काढ्याचे तीन डोस बनवावे. सकाळी जेव्हा उठाल तेव्हापासून प्रत्येक तीन तासामध्ये या काढ्याचा डोस घ्यावा. हा उपाय वापरून तुम्ही हृदयासंबंधी रोगांच्या शंकांपासून मुक्ति मिळवू शकता.

दातांची समस्या

जुन्या काळामध्ये झाडांच्या फांद्या दात घासण्यासाठी वापरल्या जात असत. रोज सकाळी सर्व लोक याचा वापर करून आपले दात स्वच्छ करत होते. पिंपळाच्या फांद्यांनी दात घासल्यास दात मजबूत होतात आणि पांढरे शुभ्र बनतात. पिंपळाच्या फांद्यापासून दातदुखी कमी होते.

अस्थमामध्ये प्रभावी

अस्थमाच्या रुग्णांसाठी पिंपळाच्या खोडाच्या सालीच्या आतील हिस्सा सुखवून त्याचे चूर्ण तयार केले जाते. या चूर्णाचे नियमित सेवन केल्यास अस्थमामध्ये आराम मिळतो. हे चूर्ण पाण्यामधून घ्यावे लागते.

सर्दी-खोकला

तुम्ही विचार करत असाल कि सर्दी-खोकला गंभीर आजार कसा होऊ शकतो. तुम्ही हा भ्रम दूर करा, प्रत्येक मोठ्या आजाराची सुरुवात सर्दी-खोकल्यापासून सुरु होते. शरीरावर व्हायरल इनफेक्श नमुळे आपली इम्यूयनिटी वीक होते आणि आपण आजारी पडतो. हा आजार दूर ठेवण्यासाठी पिंपळाची ५ पाने घेऊन ते दुधामध्ये चांगले उकळून घ्या. या काढ्यामध्ये एक चमचा साखर टाकून सकाळ संध्याकाळ प्या. जरूर आराम मिळेल.

जॉन्डिस किंवा कावीळ

जर एखाद्याला कावीळ झाली तर त्याला पिंपळाच्या पानाच्या रसामध्ये मिश्री टाकून पिल्यास कावीळ पटकन पळून जाते आणि रुग्ण लवकर बारा होतो.

(नोट- या आर्टिकलमध्ये दिल्या गेलेल्या माहितीमध्ये आम्ही दावा करत नाही कि हि माहिती पूर्णपणे सत्य आणि योग्य आहे, याचा अवलंब करण्यापूर्वी संबंधीत क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने